स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात; मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यअहवालाचे अनावरण

Date:

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथकाच्या गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित सराव शुभारंभ आणि वाद्यपूजन सोहळा केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी पथकाच्या २०२५-२६ या वर्षाच्या कार्यअहवालाचेही मोहोळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा, शिस्तीचा, परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव असल्याचे सांगितले. ढोल-ताशा ही पुण्याची सांस्कृतिक ओळख असून, त्यातून युवकांमध्ये शिस्त, समर्पण, संघभावना आणि संस्कृतीप्रती निष्ठा निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास आमदार हेमंतभाऊ रासने, आमदार भीमरावअप्पा तापकीर, महापौर मंजुषा (ताई) नागपुरे, नगरसेवक सचिन मोरे, प्रसन्नदादा जगताप, सुनीलजी पांडे, नातूबाग मंडळाचे अमित कंक, ढोल-ताशा महासंघाचे उपाध्यक्ष शिरीषजी थिटे, मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाचे निलेश वकील, अभिनेते रमेशजी परदेशी तसेच अमय खाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यात पथकाचे सचिव प्रणव गंजीवाले यांनी उपस्थितांचे स्वागत करून पथकाच्या वर्षभरातील उपक्रमांचा आणि आगामी नियोजनाचा आढावा दिला. त्यानंतर पथकाचे अध्यक्ष मयुरेश कोद्रे यांच्या नेतृत्वाखाली वादकांनी शिस्तबद्ध आणि दमदार ढोल-ताशा वादन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महापौर मंजुषा (ताई) नागपुरे यांनी स्वतः ढोल वादन करत पथकातील वादकांसोबत ताल धरला. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पथकाच्या २०२५-२६ वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्याचा आढावा देणाऱ्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. आगामी गणेशोत्सवासाठी स्वर्णाक्ष ढोल-ताशा ध्वज पथक पूर्ण तयारीत असून, शिस्त, संस्कार, परंपरा आणि उत्कृष्ट वादनाच्या बळावर यंदाही पुणेकरांसमोर दिमाखदार सादरीकरण करण्याचा निर्धार पथकाने व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून वर्षभर सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कृत्य, चौघांना अटक

पुणे -महिलांवरील तसेच महाविद्यालयीन तरुणींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस...

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO

पालघर - डहाणूच्या इराणी नगर परिसरातील 'लक्ष्मी ज्वेलर्स' या...

आंदोलक संसदेजवळ, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

नवी दिल्ली- 'कॉकरोच जनता पार्टी'चा (CJP) मोर्चा संसद...