पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून वर्षभर सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कृत्य, चौघांना अटक

Date:

पुणे -महिलांवरील तसेच महाविद्यालयीन तरुणींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलग एक वर्ष या तरुणीवर चार मित्रांकडून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमांनी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन वाघोली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही पुण्याच्या विमान नगर परिसरात वास्तव्यास आहे. 2025 मध्ये या तरुणीने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच ठिकाणी तिची ओळख या प्रकरणातील मुख्य आरोपी फरहान शेख याच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, याच विश्वासाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत फरहानने आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप या महाविद्यालयीन तरुणीने केला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, केवळ एकानेच नव्हे तर या प्रकरणातील चौघांनी मिळून गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. या खळबळजनक घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून प्रकरणातील चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. मात्र, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ;...

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटले; सोने पोत्यात भरून चोरटे पसार; VIDEO

पालघर - डहाणूच्या इराणी नगर परिसरातील 'लक्ष्मी ज्वेलर्स' या...