प्रत्येक मतदाराने SIR गणना पत्र वेळेत भरुन लोकशाही बळकट करावी!

Date:

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेअंतर्गत Enumeration Form (गणना पत्र) भरून नुकतेच बूथ लेव्हल ऑफिसर (BLO)कडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. हा अधिकार अबाधित राहण्यासाठी मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेत प्रत्येक नागरिकाने ३० जुलै पर्यंत स्वतःचे गणना पत्र भरून ते आपल्या बीएलओकडे वेळेत जमा करावे.”

ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची ही मोहीम म्हणजे मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. मतदार यादीतील माहिती अद्ययावत राहिल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता अधिकृत सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह गणना पत्र भरावे आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

दरम्यान, दर सहा वर्षांनी होणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु असून, त्यासाठीही पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपली नाव नोंदणी करावी, असेही त्यांनी यावेळी सर्वांना आवाहन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे ग्रँड सायकल टूरच्या खर्चावर प्रश्नचिन्ह; रस्त्यांच्या कामांचा तपशील जाहीर करण्याची मागणी

१६७ कोटींच्या प्रस्तावित खर्चासह मार्ग, सरफेसिंग आणि मागील कामांच्या...

घनकचरा विभागाचे नाव ‘भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ करा!

पुणे महापालिकेच्या नाव समितीसमोर उपरोधिक प्रस्ताव; प्रशासन आणि कंपनीच्या...

‘भूमी ग्रीन’ला अवास्तव दराने काम देण्याचा घाट,ओला-सुका कचरा प्रकल्पाची निविदा तात्काळ रद्द करा- ॲड. निलेश निकम

निविदा प्रक्रियेत स्पर्धा रोखण्यासाठी अटी घातल्याचा आरोप पुणे, दि. १७...

संशोधन ही समाज परिवर्तनाची प्रक्रिया

आयआयटी संचालक डॉ. शिरीष केदारे पुणे,संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची...