संशोधन ही समाज परिवर्तनाची प्रक्रिया

Date:

आयआयटी संचालक डॉ. शिरीष केदारे

पुणे,
संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची किंवा बौद्धिक कसरत करण्याची प्रक्रिया नसून, समाज परिवर्तनाच्या संधी निर्माण करणारी व्यापक प्रक्रिया आहे. संशोधनात केवळ तंत्रज्ञान विकसित करून चालत नाही, तर त्यामागे सामाजिक संदर्भ, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाचा विचार असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) संचालक डॉ. शिरीष केदारे यांनी केले.

डीईएस पुणे विद्यापीठ,सम्यक समाज अध्ययन, क्षमता संवर्धन केंद्र आणि सस्टनॅबिलीटी इनिशिएटीव्ह यांच्या वतीने ‘सम्यक-पाठयवृत्ती योजना शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, डॉ. जयंत कुलकर्णी, व्ही. के. ग्रुपचे कार्यकारी संचालक ऋषिकेश कुलकर्णी आणि सस्टनॅबिलीटी इनिशिएटीव्हच्या विश्वस्त अपूर्वा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

डॉ. शिरीष केदारे म्हणाले, “पीएच.डी. हा केवळ शैक्षणिक प्रवास नसून विचारसरणी विकसित करणारी प्रक्रिया आहे. संशोधनादरम्यान अनेक अडचणी येतात, निराशेचे क्षणही येतात; मात्र त्यावर मात करून पुढे जाण्यातच संशोधकाची खरी जडणघडण होते” संशोधन करताना केवळ तांत्रिक दृष्टिकोन न ठेवता विविध घटकांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही समस्येच्या समाधानासाठी संबंधित सर्व घटकांचा सहभाग आणि सामाजिक संदर्भ समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. रवींद्र आचार्य म्हणाले,, “डेक्कन एड्युकेशन सोसायटीचे १८ कॉलेज, ३६ शाळा आणि साठ हजार विद्यार्थी आहेत. सर्वात मोठी जागा आणि परंपरा असलेले हे विद्यापीठ आहे. डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचा सामाजिक दृष्टिकोन आमच्या डीएनएमध्ये आहे. मुळात समस्याकेंद्रित संशोधन करणे आणि केलेल्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी करणे आवश्यक आहे. यादृष्टीने या पाठ्यवृत्ती योजनेत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्या त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी केले आहे. जनजाती समाजातील विज्ञान आम्हाला पुस्तक रूपात पुढे आणायचे आहे. यासाठी आम्ही वनांचल विज्ञान केंद्रही सुरू करणार आहोत.”

कुलगुरू डॉ. राजेश इंगळे म्हणाले, ‘रिसर्च टू इम्पॅक्ट’ हीच काळाची गरज आहे. संशोधनाचा प्रत्यक्ष समाजाला उपयोग होणे हेच त्याचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सामाजिकदृष्ट्या जबाबदार नेतृत्व, नवोपक्रम आणि पुराव्यांवर आधारित धोरणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सम्यक सेंटर ऑफ सोशल स्टडीज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली ही फेलोशिप तरुण संशोधक, नवोपक्रमक आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. जयंत कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. सागर विद्वांस यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ.शीतल रुईकर यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...