पुणे, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सचिन गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक शिवाजीनगर येथील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आली.
बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भूमिका, घरभेट मोहीम, गणना भरण्याची प्रक्रिया, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे-हरकती स्वीकारणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्त करावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नोंदणी अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी सर्व पक्षांच्या सहकार्याचे आवाहन प्रशासनाने केले. बैठकास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

