घनकचरा विभागाचे नाव ‘भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ करा!

Date:

पुणे महापालिकेच्या नाव समितीसमोर उपरोधिक प्रस्ताव; प्रशासन आणि कंपनीच्या कथित संबंधांवर गंभीर आरोप

पुणे, दि. १७ जुलै : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नाव बदलून ‘पुणे मनपा भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ असे करावे, असा उपरोधिक प्रस्ताव महापालिकेच्या नाव समितीसमोर मांडण्यात आला आहे. या प्रस्तावातून घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि भूमिग्रीन कंपनीमधील कथित जवळिकीवर तीव्र टीका करण्यात आली आहे.

नाव समितीसमोर सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचे सूचक रफिक अब्दुल रहीम शेख असून, सौ. दीपाली संतोष डोख यांनी त्याला अनुमोदन दिले आहे.

प्रस्तावात म्हटले आहे की, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अभियंते, वरिष्ठ अधिकारी, दक्षता विभाग आणि आयुक्त कार्यालय हे भूमिग्रीन कंपनीच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. “भूमिग्रीनसाठी वाट्टेल ते” या भूमिकेतून प्रशासन काम करत असल्याचा आरोपही प्रस्तावात करण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि भूमिग्रीन कंपनी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा समज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झाल्याचे प्रस्तावकर्त्यांनी म्हटले आहे. भूमिग्रीन कंपनीला मोठ्या किमतीच्या निविदा मिळवून देण्यासाठी प्रशासनातील काही घटक प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

घनकचऱ्याऐवजी महापालिका प्रशासनात ‘धनकचरा’ असा उल्लेख होण्याची वेळ आली असल्याची उपरोधिक टिप्पणी प्रस्तावात करण्यात आली आहे. भूमिग्रीन कंपनीचा उल्लेख होताच प्रशासनात उत्साह आणि जल्लोष निर्माण होत असल्याचे नमूद करत, कंपनी आणि घनकचरा विभागाचे कथित अतूट नाते भविष्यातील पुणेकरांच्या स्मरणात राहावे, यासाठी विभागाच्या नावातच भूमिग्रीनचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा प्रस्ताव उपरोधिक स्वरूपाचा असला तरी त्यातून घनकचरा प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया, ठेकेदारांची निवड आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

या आरोपांबाबत पुणे महापालिका प्रशासन अथवा भूमिग्रीन कंपनीची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रत्येक मतदाराने SIR गणना पत्र वेळेत भरुन लोकशाही बळकट करावी!

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे...

‘भूमी ग्रीन’ला अवास्तव दराने काम देण्याचा घाट,ओला-सुका कचरा प्रकल्पाची निविदा तात्काळ रद्द करा- ॲड. निलेश निकम

निविदा प्रक्रियेत स्पर्धा रोखण्यासाठी अटी घातल्याचा आरोप पुणे, दि. १७...

संशोधन ही समाज परिवर्तनाची प्रक्रिया

आयआयटी संचालक डॉ. शिरीष केदारे पुणे,संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची...