इतर मागासवर्गीयांसाठी स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र नागरिकांना स्वयंरोजगार, उद्योग व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (१५ लाख रुपयांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (१० ते ५० लाख रुपये), महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना (५ ते १० लाख रुपये), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (देशांतर्गत १० लाख व परदेशी शिक्षणासाठी २० लाख रुपये) तसेच १ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

पात्र लाभार्थ्यांनी बँकांकडून मंजूर झालेल्या कर्जावरील व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी www.msobcfdc.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९ वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले थांबवा; भारताची इराणला कडक समज

भारतीय खलाशाचा मृत्यू; भारताशी संबंधित ११ जहाजे आणि १४८...

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात एटीएसची 65 ठिकाणी छापेमारी:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त

पुणे-महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 23...

पुण्यात टोळक्याची दहशत,सहकारनगरमध्ये मध्यरात्री 4 मोटारींची तोडफोड: 18 जणांविरुद्ध गुन्हा

पुणे-पुण्यातील सहकारनगर भागात टोळक्याने मध्यरात्री दहशत माजवत चार मोटारींची...

‘पीएमआरडीए’ची मोई येथे सर्वात मोठी कारवाई; ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त!

३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त; १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २० तासांची विक्रमी...