‘पीएमआरडीए’ची मोई येथे सर्वात मोठी कारवाई; ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त!

Date:

  • ३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त; १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २० तासांची विक्रमी धडक कारवाई!

राजगुरुनगर/पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत पत्राशेडविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली. सलग दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आली. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले होते.

या कारवाईसाठी ६५० पोलीस अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) ५० जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाचे ३० जवान तैनात करण्यात आले होते. सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. जेसीबी, पोकलॅन मशीन आणि मजुरांच्या साहाय्याने अनधिकृत पत्राशेड हटविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका, खेड येथील विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

कारवाईच्या अंमलबजावणीसाठी ‘पीएमआरडीए’चे दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल झेंडे, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, ‘पीएमआरडीए’चे सहआयुक्त हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, महाळुंगेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, तहसीलदार रवींद्र रांजणे, तहसीलदार आशा होळकर, उपअभियंता रितेश मुंढे आणि तपन डंके आदी अधिकारी दोन्ही दिवस घटनास्थळी उपस्थित होते.

तब्बल २० तास कारवाई; १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह यंत्रसामग्रीचा फौजफाटा

‘पीएमआरडीए’ने मौजे मोई येथील ६८ गट क्रमांकांमधील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांविरोधात धडक कारवाई करत, सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रात पसरलेली तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे भुईसपाट केली. ही मोहीम १३ व १४ जुलै २०२६ रोजी सलग २० तास राबविण्यात आली. या मोहिमेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोहिमेत एकूण १,००० अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये पोलीस विभागाचे ६५० कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (एमएसएफ) ५० जवान, पीएमआरडीएच्या अग्निशमन विभागाचे ३० जवान, तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे १७० अधिकारी, कर्मचारी व इतर यंत्रणांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामध्ये १२ पोकलॅन, १२ जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर, हायड्राक्रेन आणि गॅसकटर यांसारख्या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने पत्राशेड व बांधकामे हटविण्यात आली. सलग २० तास चाललेली ही संपूर्ण कारवाई अत्यंत शांततेत पार पडली असून, परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.

“‘पीएमआरडीए’च्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड अथवा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. मोई परिसरातील कारवाई ही धडक मोहिमेचा एक भाग आहे. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. ‘पीएमआरडीए’तर्फे आगामी काळातही अशी कडक कारवाई सुरूच राहील.”
– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

59 हजार 795 विद्यार्थ्यांना थेट दिले 22.98 कोटी रुपये

पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करावे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ...

मेट्रोच्या कामामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या

मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे महापालिका व...

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी...