59 हजार 795 विद्यार्थ्यांना थेट दिले 22.98 कोटी रुपये

Date:

पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करावे

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. 14 जुलै : पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करता यावे यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेअंतर्गत 59 हजार 795 विद्यार्थ्यांच्या अथवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांवर 22 कोटी 98 लाख 2 हजार 684 रुपये आज अखेर जमा करण्यात आले असून पालकांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करावे असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शालेय साहित्य खरेदीसाठी इयत्तानिहाय निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे, त्याचा तपशील पुढील प्रमाणे

इयत्ता 1 ली : 2,250 विद्यार्थी : ₹ 64,99731
इयत्ता 2 री : 8,406 विद्यार्थी : ₹ 2,19,42,475
इयत्ता 3 री : 9,023 विद्यार्थी : ₹ 2,83,19,222
इयत्ता 4 थी : 10,078 विद्यार्थी : ₹ 2,79,86,141
इयत्ता 5 वी : 9,029 विद्यार्थी : ₹ 4,28,38,362
इयत्ता 6 वी : 9,122 : ₹ 4,18,81,766
इयत्ता 7 वी : 8,407 विद्यार्थी : ₹ 4,34,59,140
इयत्ता 8 वी : 3,480 विद्यार्थी : ₹ 1,68,75,845

एकूण : 59,795 विद्यार्थी : ₹ 22,98,02684

भिमाले म्हणाले, “बालवाडी-1, बालवाडी-2, इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांचा यू-डायस (U-DISE) प्रणालीवरील कायमस्वरूपी विद्यार्थी नोंदणी क्रमांक (PEN) तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांचा पेन क्रमांक प्राप्त होताच डीबीटीद्वारे निधी हस्तांतरित करण्यात येईल.
तसेच माध्यमिक विभागातील सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांसाठी डीबीटीची बिलिंग प्रक्रिया सुरू असून ती 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.”

भिमाले पुढे म्हणाले, “डीबीटीद्वारे मिळालेल्या निधीतून पालकांना गणवेश, दप्तर, बूट, मोजे, वह्या, रंगपेटी, चित्रकला साहित्य, शालेय स्टेशनरी, लिखाण साहित्य तसेच दर दोन वर्षांनी स्वेटर खरेदी करता येणार आहे. विद्यानिकेतन व क्रीडानिकेतन शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष गरजेनुसार शालेय साहित्य स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाते.”

श्रीनाथ भीमाले यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या पालकांच्या खात्यावर डीबीटीची रक्कम जमा झाली आहे त्यांनी तातडीने शालेय साहित्य खरेदी करून त्याच्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे त्वरीत जमा कराव्यात, जेणेकरून प्रक्रियेची पूर्तता वेळेत होईल.

यंदाच्या वर्षी डीबीटी प्रक्रिया 18 जूनपासूनच सुरू करण्यात आली होती. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही दिवसांचा विलंब झाला. गेल्या तीन वर्षांत ही प्रक्रिया प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात सुरू होत होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शालेय साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता असे भीमाले यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ची मोई येथे सर्वात मोठी कारवाई; ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त!

३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त; १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २० तासांची विक्रमी...

मेट्रोच्या कामामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्या

मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे महापालिका व...

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी...

जावयांना सासरकडील नातेवाईकांकडून मारहाण:पुणे शहरातील दोन घटना, एकाचे नाक फ्रॅक्चर

पुणे -शहरात सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन स्वतंत्र...