Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यूपीएससी मध्ये भारतातून प्रथम आलेल्या -अनिदीप धुरीशेट्टी, अनुकुमारी सचिन गुप्ता यांच्याशी संवाद साधण्याची संधी

Date:

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे
‘यूपीएससी-२०१७’ यशस्वितांचा १०वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ २९ जून रोजी

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१७ मधील यशस्वितांच्या १०व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याचे शुक्रवार दि. २९ जून २०१८ रोजी सकाळी ११.०० वा. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
देशातून प्रथम आलेला अनिदीप धुरीशेट्टी, द्वितिय आलेली अनुकुमारी आणि तिसरा आलेला सचिन गुप्ता यांच्यासह इतर यशस्वितांना गौरविण्यात येणार आहे. यूपीएससी मध्ये भारतातून प्रथम येणार्‍यास शाल, ज्ञानेश्‍वरांची प्रतिमा व सन्मानपत्र व ५१ हजार रूपये रोख देण्यात येणार आहेत. तसेच द्वितीय क्रमांकास -३१ हजार रूपये रोख व तृतीय क्रमांकास-२१ हजार रूपये रोख देण्यात येतील. तसेच, महाराष्ट्रातून प्रथम आलेले व देशातून २० वे स्थान मिळविणारे गिरीष बडोले, राज्यातून दुसरा आलेला व एमआयटीचा माजी विद्यार्थी दिग्विजय बोडके व तिसरा आलेले डॉ. सुयश चव्हाण हेही उपस्थित राहतील.
या समारंभासाठी द कॉमन वेल्थ ऑफ नेशन्सचे माजी महासचिव श्री. कमलेश शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अ‍ॅकॅडमीच्या माजी संचालिका श्रीमती अरूणा एम.बहुगुणा व भूतपूर्व एयर चीफ मार्शल ए.वाय. टिपणीस हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना या टॉपर्सशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित अशा या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे यंदा १०वें वर्ष आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये केले आहे. पहिले सत्र २९ जून रोजी  सकाळी ८.३० ते दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होणार असून येथे सत्कार सोहळा व भारतातील पहिल्या तीन टॉपर्स विद्यार्थांशी संवाद साधणार आहेत. दुसरे सत्र दिनांक २९ जून रोजी दुपारी २.०० ते ४.३० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे होणार असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व टॉपर्सचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
प्रशासनामध्ये काम करीत असताना अनेक प्रलोभने सामोरी येतात, त्यांना बळी न पडता देशापुढे चांगल्या कारभाराचा आदर्श कसा ेठेवावा, चांगले प्रशासन कसे असते, हे या स्नातकांना समजावे; त्यासाठी या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा आणि त्यांच्यावर जनहिताचे चांगले संस्कार व्हावेत, हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा हेतू आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, चंडीगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, ओरिसा, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, छत्तीसगड, हरियाना, सिक्कीम, नागालँड आदी भारताच्या सर्व राज्यातील आयएएस, आयपीएस, आयआरएस व इतर केंद्रीय सेवेमधील यशस्वी झालेल्या १०० ते १२५ विद्यार्थ्यांनी या समारंभास हजर राहण्यास संमती दिली आहे.
या सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेचा महत्वाचे अधिकारी म्हणून भाग होणार आहेत. प्रशासकीय सेवा, विधिमंडळाने पारित केलेले कायदे हे योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने  त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील, तसेच, महाराष्ट्रातील यूपीएससी-एपीएससी परिक्षार्थींना या यशस्वितांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच, त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रेरणा आहे. या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी www.mitcst.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७७७४०२३६९८, ०७७७४०२३६९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
अशी माहिती एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हनमेंटचे संचालक प्रा. डॉ. सत्यसाई कुमार जिलेला व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे व्यवस्थापन पदवी विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ -अमृता फडणवीस

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई...

‘माझ्या हत्येचा कट ही त्यांच्या शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज...

संजीवन वनउद्यान येथे ५०० देशी झाडांची वृक्षलागवड  

महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि...

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील बेरोजगार युवकांला रोजगार उपलब्ध करुन त्यांचे...