पुणे- शहरातील वानवडी पोलिस ठाणे हद्दीत 7 चोरट्यांनी मास्क लावून मोहम्मदवाडी रोड वारकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा टाकून 300 ते 400 ग्रॅम सोने चोरून नेले आहे. चोरटे मोटार सायकल वरून पसार झाले असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदवाडी रस्त्यावर बीजे ज्वेलर्स हे सोने चांदीचे सराफ दुकान आहे. संबंधित ठिकाणी दुकान मालक आणि कामगार हे काम करत असताना, अचानक तीन मोटरसायकलवर मास्क लावून अनोळखी दरोडेखोर त्याठिकाणी आले. त्यांनी दुकानातील कामगारांना धमकावून तसेच त्यांची धमकी देत, त्यांना शस्त्राचा धाक दाखवून सोने लुटण्याचा प्रकार केला आहे. दरोडेखोरांनी संबंधित दुकानातून अंदाजे तीनशे ते चारशे ग्रॅम सोनं पळून नेल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित आरोपी हे दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याआधारे त्यांची ओळख पटवून शोध घेण्यात येत आहे.