Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीतमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विश्वास

Date:

मुंबई-सत्ता असताना 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. गरीबी हटाव चे आश्वासन अनेक वर्षे सत्ता भोगूनही पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशा शब्दांत यादव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
यादव म्हणाले की, बहुमताच्या बळावर मागच्या 10 वर्षांत भाजपा-एनडीए सरकारने वेगाने देशाचा विकास आणि देशहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत. भाजपा-एनडीए ने 400 जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल 100 वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. 1950 मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत 11 वेळा, इंदिरा गांधींनी 17 वेळा तर राजीव गांधींच्या राजवटीतच 10 वेळा संविधानात बदल केले गेले होते याची श्री. यादव यांनी आठवण करून दिली. आणीबाणी लागू करून संविधान, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसनेच केले असे सांगून ते म्हणाले की संविधान बदलाच्या काँग्रेसच्या खोट्या अपप्रचारावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत.
अनेक दाखले देत श्री. यादव यांनी एनडीए,महायुती आणि युपीए ,मविआ सरकार या दोहोंमधला फरक दाखवून दिला. एकीकडे सागरी सेतू, मेट्रो, पूल, रस्ते बांधणारे, कलम 370 हटवून जम्मू काश्मीरच्या जनतेला न्याय देणारे, ट्रिपल तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांचा सन्मान राखणारे, जातपात न पाहता सर्वांसाठी गरीब कल्याणाच्या योजना राबवणारे भाजपा-एनडीए, महायुती सरकार आहे. तर दुसरीकडे सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. विरोधक समजतात तशी जनता दुधखुळी नाही. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देत नकली शिवसेना हिंदूत्वविरोधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली आहे अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत ते म्हणाले की नकली शिवसेनेचे इतके अध:पतन झाले आहे की व्होटबँकेचे राजकारण करणा-या काँग्रेसच्या रांगेत ते जाऊन बसले आहेत. 1993 बॉंम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मुसाला उबाठा सेनेच्या प्रचारात उतरवून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणा-य़ा दहशतवाद्यांचे समर्थन नकली शिवसेना करत आहे. हा मुंबईकरांचा घोर अपमान आहे.
इंग्रज गेले पण काँग्रेसला सोडून गेले अशा शब्दात श्री. यादव यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. केवळ दोषारोप करणे आणि जात-धर्माच्या नावावर विभाजन करणे हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे. इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा हीच नीती काँग्रेसची असल्याची टीका श्री. यादव यांनी केली. या ना त्या प्रकारे समाजात फूट पाडण्याचे उद्योग काँग्रेस आणि घमंडिय़ा आघाडी करत असल्याचेही ते म्हणाले. मागील 10 वर्षात भाजपा-एनडीए सरकारच्या कामाचे प्रगतीपुस्तक सर्वांसमोर खुले आहे. 25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले, मोफत धान्य, वीज, पाणी, गॅस जोडणी, आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून दिला. देशाची जागतिक स्तरावर प्रतिमा उजळवत देशाला बलशाली बनवले .

मोदी सरकारने भारतीय सांस्कृतिक स्थळांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांची पुनर्बांधणी केली आहे. मोदी सरकारमुळेच अयोध्येत रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आता जनतेच्या नजरा मथुरेतील गोपाळकृष्णाकडे लागल्या आहेत हे आम्ही जाणून आहोत असे ते म्हणाले. तिस-यांदा मोदी सरकारला सत्तेत आणण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा शून्य

डोंगराळ भागातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे थंडीने कहर करायला सुरुवात...

संघर्ष वादळाचा..

सलग सात वेळा महापालिका निवडणूक निवडून आलेले,म्हणजे ३५ वर्षे...

सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील एका फ्लॅटसह ‘रुट २४ हॉटेल’च्या हुक्का पार्लर्सवर छापा

पुणे-सिंहगड कॉलेज कॅम्पसमधीलपायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४...