खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

Date:

पुणे : महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वे गाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे दुर्लक्ष करून फारशी मागणी नसलेली पुणे – जबलपूर रेल्वे सेवा सुरू करणारे केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे की जबलपूरचे? असा सवाल माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे आज (सोमवारी) केला आहे.

पुणे – जबलपूर विशेष रेल्वे सेवेला आमचा विरोध नाही. पण, पुणेकरांच्या, महाराष्ट्रातील लोकांच्या मागण्या दुर्लक्षित करून जबलपूरसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा भाजप सरकारचा अट्टाहास कशासाठी आहे?, त्यांना कोणाचे राजकारण साधायचे आहे? असे प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रातील गाड्यांचे टर्मिनल हडपसर येथे हलविण्यात येत आहे आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या पुणे स्थानकावरून सोडल्या जात आहेत. हा भेदभाव धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे पुण्यातील प्रवासी कोल्हापूर, मुंबई भागात पुणे स्थानकावरून जात असताना त्यांना त्यासाठी हडपसरला जायला लावण्याचा आटापिटा त्रासदायक आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक आणि पुणे ते संभाजीनगर अशा जास्त वर्दळीच्या मार्गावर जास्त गाड्या सुरू व्हाव्यात अशी महाराष्ट्रातील लोकांची मागणी आहे. या मागणीकडे रेल्वे खात्याचे दुर्लक्ष आहे. पुण्यातील रेल्वे सेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी पुणेकर अनेक वर्षे करीत आहेत. पुणे – लोणावळा लोकल सेवा विस्कळीत आहे. त्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेबाबतही पुणेकरांच्या मनात भीती आहे. स्थानकावर अस्वच्छता असते, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, अशा तक्रारी प्रवाशांच्या आहेत, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो असो, अथवा रेल्वे भाजपच्या सरकारकडून गेली १२ वर्षे पुणेकरांवर अन्यायच होत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सभासद संस्थेसोबत निष्ठेने असले तर कितीही अडचणी आल्या तरी संस्था संपत नाही

सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्रादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रतिपादन सातारा -...

भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी संपन्न; प्रशासकीय सज्जतेवर भर

पुणे: भवानी पेठ येथील पालखी मुक्काम स्थळाची आज प्रशासकीय...

सध्याचे भोंदूबाबा ,बुवा हे सरकारच्याच आश्रयाखाली : धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही?

'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट...