सभासद संस्थेसोबत निष्ठेने असले तर कितीही अडचणी आल्या तरी संस्था संपत नाही

Date:

सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्रादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रतिपादन

सातारा – आमचाही कारखाना अडचणीत होता. सभासदांचे जर संस्थेवर प्रेम, विश्वास असेल तर काय होऊ शकतं याचे उदाहरण ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना’ आहे. सभासदांचा संस्थेवर विश्वास, निष्ठा होती म्हणून संस्था पुन्हा एकदा मूळ पदावर येऊ शकली. जर सभासद संस्थेसोबत निष्ठेने असले तर संस्थेला कितीही अडचणी आल्या तरी ती कधीही संपू शकत नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीने अद्यावत सहकार प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन व सहकारी बोर्ड यांच्या वतीने आयोजित सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्राचा शुभारंभ आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक सुनील खत्री, कांचन साळुंखे, राज्य सहकारी संघाचे संचालक नंदकुमार काटकर, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, निमंत्रक धनंजय शेडगे, सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संजीव साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, सुनील ताटे, सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे ज्येष्ठ संचालक शाहूराज फाळके, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूरे, सतीश देशमुख यांसह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, सातारा जिल्ह्याला सहकाराची फार मोठी परंपरा आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर या जिल्ह्यात काम करणाऱ्या सर्वांनी जे सहकार क्षेत्र स्थापन केले ते वाढलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे हा प्रयत्न प्रत्येकाने केला. म्हणून सातारा जिल्ह्यात सहकाराची जी पाळमुळे आहेत ती खोलवर रुजली आहेत. सहकारात अडचणी आहेत, त्या येत राहणार. आज पुढे असलेल्या अडचणींवर मात केली त्या नवीन अडचणी उभ्या राहणार याबाबत कोणी मनात शंका ठेवू नये. जरी अडचणी आल्या तरी सहकार क्षेत्र सक्षम झालं पाहिजे, वाढलं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. केंद्रात सहकार खाते वेगळे निर्माण करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सहकाराला बळकटी मिळाली आहे. अनेक वर्षापासूनचे प्रश्न प्रलंबित होते. ते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून एका क्षणात सुटले.

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले की आमचाही कारखाना अडचणीत होता. सभासदांचे जर संस्थेवर प्रेम, विश्वास असेल तर काय होऊ शकतं याचे उदाहरण अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे. सभासदांचा संस्थेवर विश्वास, निष्ठा होती म्हणून संस्था पुन्हा एकदा मूळ पदावर येऊ शकली. सभासद जर संस्थेसोबत निष्ठेने असले तर संस्थेला किती अडचणी आल्या तरी ती कधीही संपू शकत नाही. जिल्ह्यातील पक्षीय राजकारण सहकारात येणार नाही यासाठी आमचा प्रयत्न नेहमी राहिला असून पुढेही राहील, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला.

तर उपस्थितांना संबोधित करताना आमदार दरेकर म्हणाले की, १०७ वर्षांची परंपरा असणारा राज्य सहकारी संघ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा संघ आहे. वसंतदादा पाटील, वैकुंठ भाई मेहता, म्हणजे गाडगीळ यांसह अनेकांनी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र सहकारी चळवळीला दिशा व मार्गदर्शन दिले. परंतु २०१३ ला उत्पन्नाचे जे स्त्रोत होते तो शिक्षण निधी घटनादुरुस्तीनंतर बंद करण्यात आला. त्यामुळे १०७ वर्षाची परंपरा असणारा राज्य संघ चालवणे अडचणीची झाले. परंतु आता या संघाला ताकद देण्याची आवश्यकता आहे. राज्याला सहकाराचा मोठा वारसा आहे. सहकाराला उर्जितावस्था देण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, संघाच्या मार्फत आम्ही व्यवस्था उभ्या करू सरकारच्या मार्फत मदतही मिळवू परंतु सहकारातील कार्यकर्त्यांचा नेत्यांचा जो आत्मविश्वास हरवला आहे तो उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे पुण्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्या मेळाव्यात आत्मविश्वास घेऊन महाराष्ट्रातील जिल्हा बोर्डाचे प्रतिनिधी कर्मचारी गेले. पश्चिम महाराष्ट्र हे सहकाराचे प्रमुख क्षेत्र आहे महाराष्ट्राला ताकतीने सहकार हा सातारा सांगली कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्र दाखवलाय. पुन्हा या भूमीतून सहकाराला उर्जितावस्था देण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच मेळावा घेतला पाहिजे ते शिबिर आज संपन्न होत आहे. सातारा जिल्हा अनेक थोर नेत्यांचा जिल्हा आहे. कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम सहकारी कारखान्यांनी केले. जिल्हा बँकांच्या माध्यमातून गावच्या विविध कार्यकारी सोसायटी असो किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या संस्था असो जिल्हा बँकांच्या माध्यमातून त्यांना ताकद देण्याचे कामही जिल्हा मध्यवर्ती बँकांनीच केले आहे. राज्यातील सहकार चळवळीची परिस्थिती पाहता ती अडचणीची आहे. विदर्भातील सहकार चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात सहकार चळवळ ताकदवान करण्याची गरज आहे. ज्या संस्था सशक्त आहेत या संस्थांनी इतरांना ताकद देण्याचे काम करावे लागेल निश्चितच ते काम येणाऱ्या काळात आपण करू अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. राज्यसंघाचे 33 जिल्हा बोर्ड कार्यरत आहेत. तेरा प्रशिक्षण केंद्र आहे. विभागीय व्यवस्था उभ्या आहेत. अडीच लाख सहकारी संस्था राज्यात आहे. गावच्या पॅक सोसायटीपासून छोट्या मोठ्या सहकारी संस्थेला व्यवस्थापन कसे करावे मार्केटिंग कसे करावे व समाज जीवन कशा पद्धतीने भक्कम होईल या संदर्भातील मार्गदर्शन सर्व जिल्हा बोर्डाने करण्याची गरज आहे. सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते सहकाऱ्याला ज्या ज्या ठिकाणी सांगतोय तिथे ताकद देत आहेत. त्यांच्या माध्यमातूनही येणाऱ्या काळात आपला सहकार मजबूत करण्याचे काम करणार आहोत. सहकारी संस्था सशक्त झाल्या पाहिजे त्यांना ताकद मिळाली पाहिजे या अनुषंगाने काम करूया आवाहनही दरेकर यांनी सहकारी कार्यकर्त्यांना केले.

मुंबईत सहकारी कार्यकर्त्यांसाठी
हक्काचे सहकार भवन असणार

आपण मुंबईत सहकार भवन उभारणार आहोत. मुंबईत सहकारी कार्यकर्ते येतात, त्यांना राहायची व्यवस्था नसते. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली. सायनला सहकार भवनसाठी भूखंड दिला. त्याचे नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. येणाऱ्या दोन वर्षात सहकारी कार्यकर्त्यांसाठी हक्काचे सहकार भवन मुंबईत असणार असेही दरेकरांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजुरी; पुणे-जबलपूर रेल्वेही होणार नियमित

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश पुणे-जबलपूर...

खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे : महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वे गाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे...