पुणे-प्लास्टिक बंदी च्या निर्णयानंतर आपल्या भागातील नागरिकांना अचानक त्रासाला सामोरे जावे लागतेय हे पाहून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने नगरसेवक अजित दरेकर यांनी पूर्व भागात ४००० कापडी पिशव्यांचे नागरिकांना मोफत वाटप केले. या प्रसंगी हेमंत राजभोज, रवि पाटोळे, शाबिर खान, अशपाक शेख, रघुराज दरेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.