खासदार संजय राऊत नगरमध्ये म्हणाले होते की, आपल्याला इतिहासात डोकावे लागेल. मुघल बादशहा औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. तेथील माती औरंगजेबाची आहे. त्या मातीतील 2 व्यापारी आहेत. औरंगजेब व नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातच्या दावत गावात झाला. त्यामुळे हे दोन व्यापारी आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने वागत आहेत. एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडले, तर तू कोण? असे ते म्हणाले होते.
पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी शुक्रवारी याविषयी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर भादंवि कलम 171 (क) 506 व लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) अंतर्गत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अहमदनगर-मुघल बादशहा औरंगजेब यांच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी टीका केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या या मुलूख मैदानी तोफेच्या अडचणींत वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा झाली होती. या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी भाषेत निशाणा साधला होता. औरंगजेब व पंतप्रधान मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता. आम्ही औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडले, तर तू कोण? असे ते मोदींविषयी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.