पुणे-तुमची विणकामाची कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचा उपयोग लहान मुलं, वृध्द, कॅन्सररुग्ण, गरजूंसाठी करीत आहात हे एक खूप महत्वाचं कार्य आहे; असे गौरवोद्गार महापौर मुक्ता टिळक यांनी काढले.
निम्मित होते मदर इंडियाज क्रॉशेट क्वीन्स (M I C Q) यांच्या वतीने ५ किमी लांबीच्या स्कार्फ विणकामाच्या गिनीज वल्ड रेकॉर्डसाठी पुण्यातील ४५ महिलांच्या विणकामाप्रसंगी त्या बोलत होत्या. याची नोंद २१ मे २०१७ रोजी चेन्नई येथे होणार आहे.
तुमच्या या उपक्रमातून नवीन पिढीलाही एक चांगला संदेश, संस्कार तुम्ही देत आहात, कुठलीही महिला असो, तिचं चांगलं काम असो त्याला प्रोत्साहन देणं हे पुणे शहराची प्रथम नागरिक म्हणून माझं कर्तव्यच आहे. तुमच्या गिनीज वल्ड रेकॉर्डसाठी माझ्या खूप शुभेच्छा असही त्यांनी या वेळी सांगितलं.
वयाची मर्यादा न ठेवता आजच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नवीन संघटनात्मक कार्य आणि उपक्रम कसा करता येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमची ही संस्था आहे; अशा शब्दात या सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी कौतुक केले. यापूर्वी या संस्थेच्या महिलांनी २०१६ मध्ये सर्वात मोठे ब्लॅंकेट विणण्याचा गिनीज वल्ड रेकॉर्ड केला आहे. महापौर मुक्ताताई टिळक यासुध्दा या संस्थेच्या सभासद झालेल्या आहेत. मदर इंडियाज क्रॉशेट क्वीन्सच्या संस्थापिका सुबश्री नटराजन, पुणे को-ऑर्डीनेटर मीनाक्षी गणेश, संगीता लुणावत, आदिती वळसंगकार, अमृता बर्वे, राणी संजीवनकुमार, प्राची बाग, रेवती वरदराजन, अँड्रिया सलढाणा यासह पुण्यातील ४५ महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
या सोहळ्याला मनोज देशपांडे, अविनाश शिळीमकर, नगरसेवक सुनील कांबळे, नगरसेविका राजश्री शिळीमकर, विनोद ओस्तवाल आदी मान्यवर उपस्थित होते
या सोहळ्याचे सूत्रसंचालन आभारप्रदर्शन आदिती वळसंगकर यांनी केले.
विणकामाच्या माध्यमातून गिनीज वल्ड रेकॉर्डसाठी एकवटली महिला शक्ती
Date: