युवा माळी संघटनेच्यावतीने ” गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ” संपन्न

Date:

पुणे-युवा माळी संघटनेच्यावतीने ” गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ” संपन्न झाला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तात्रय बाळसराफ , प्रमुख पाहुण्या म्हणून माजी आमदार कमलताई ढोलेपाटील , प्रकाश फुलारे , युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत , सचिव वृषाली शिंदे , माजी नगरसेवक संदीप लडकत , ऍड. भालचंद्र कोद्रे , बाबुराव धायरकर , बाळासाहेब आल्हाट , सिताराम झगडे , उन्नती बोरावके , प्रितेश गवळी ,दीपक जगताप ,  महात्मा फुले मंडळ अध्यक्ष चांगदेव पिंगळे , दत्तात्रय भुजबळ आदी मान्यवर , पालकवर्ग , विद्यार्थीवर्ग व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

   या कार्यक्रमाचे उदघाटन संत सावतामाळी , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून दीपप्रज्वलित करून उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी माजी आमदार कमल ढोलेपाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , माळी समाज हा कष्टकरी समाज आहे , विद्यार्थ्यांनी आपल्या कलेप्रमाणे आपले करिअर घडवावे , विद्यार्थ्यांनी आपल्या कामाचे सोने करून दिले पाहिजे . महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती जाणून घ्या , त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन घडा .

  यावेळी समारंभाचे अध्यक्ष इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,दहावी हे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे , तर बारावी हे जीवनाला गती देणारे वर्ष आहे , विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन आपले करिअर घडवावे , परंतु आजच्या काळात मोबाईल व बाईक या दोन गोष्टी करिअरमध्ये अडचणीच्या ठरत आहे . या भौतिक गोष्टीना महत्व न देता आत्मविश्वासाने आपले करिअर घडवावे,  ज्ञानधिष्ठीत समाज घडवा .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर यांनी केले तर आभार धनिष्ठा कल्याणकर यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत:काँग्रेसचे नेते चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली व्यतिरिक्त महसुली खात्यात...

काँग्रेसचे अभय छाजेड अपघातात जखमी

पुणेकाँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अभय छाजेड...

पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा;गॅस्ट्रो आणि टायफॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे-पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या...