· स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 01 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 371 रुपये ते 390 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
· बोली/ऑफर बुधवार 06 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल.
· बोली किमान 38 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 38 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· अधिक माहितीसाठी, कृपया संलग्न म्हणून शेअर केलेली किंमतपट्टा जाहिरात पहा किंवा फायनान्शिअल एक्सप्रेस वृत्तपत्राच्या 30 ऑक्टोबर 2024 च्या अंकातील पृष्ठ क्रमांक 26 वर प्रकाशित किंमतपट्टा जाहिरात पहा
मुंबई,: स्वीगी लिमिटेड (“कंपनी”) इक्विटी शेअर्सची (“ऑफर”) प्राथमिक समभाग विक्री बुधवार 06 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करत आहे. बोली शुक्रवार 08 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक कार्यालयीन दिवस आधीची मंगळवार 05 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
स्वीगी लिमिटेडच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 371 रुपये ते 390 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 38 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 38 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
या ऑफरमध्ये 44,990 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकांकडून 175,087,863 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“ऑफर केलेले शेअर्स”) ऑफर फॉर सेल आहे. या ऑफरमध्ये प्रत्येकी 01 रुपये दर्शनी मूल्याच्या 750,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा राखीव हिस्सा असून पात्र कर्मचाऱ्यांद्वारे (“कर्मचारी राखीव हिस्सा”) सबस्क्रीब्शनसाठी पोस्ट ऑफर पेड अप भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसलेला इक्विटी शेअर्सचा राखीव हिस्सा समाविष्ट आहे. कर्मचारी राखीव हिस्स्याशिवाय असलेली ऑफर यापुढे “नेट ऑफर” म्हणून ओळखली जाते.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर करण्यात आलेले कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(2) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 75 % पेक्षा कमी नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. किमान 75% नेट ऑफर QIBs ना वाटप करता येत नसेल, तर संपूर्ण बोली रक्कम (जशी येथे पुढे परिभाषित केली आहे) तात्काळ परत केली जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी निव्वळ QIB वाटपाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक इक्विटी शेअर्सना उर्वरित QIB भागामध्ये समाविष्ट केले जाईल आणि QIB ना प्रमाणानुसार वाटप केले जाईल. तसेच, नेट ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी (अ) बिगर संस्थात्मक विभागाच्या एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) बिगर संस्थात्मक विभागाच्या दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या बिगर संस्थात्मक विभागाच्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या बिगर संस्थात्मक विभागाच्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस पेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर आणि नेट ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेल्या बोलीवर सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफर किमतीवर किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झाल्यास तो भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“RIB”) उपलब्ध होईल.
तसेच, कर्मचारी राखीव कोट्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किंमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर प्राप्त झालेल्या वैध बोलींनुसार, समप्रमाणात इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशीलांसाठी, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या पृष्ठ क्रमांक 445 वर सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पाहा.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, BofA सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेफ्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि अॅव्हेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरलेले परंतु परिभाषित न केलेले शब्द त्यांच्या अर्थांसह RHP मध्ये दिलेल्या परिभाषेप्रमाणेच मानले जातील.