पुणे : भारतीय संस्कृतीसाठी जाज्वल्य अभिमान ठरणाऱ्या व अटके पार लौककक पोहोचलेल्या गणेशोत्सवाचा महीमा हा खरोखरच अपरंपार आहे.
लोकमान्यांनी सामाजीक एकतेसाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि आजमितीला हे गणेशोत्सवाचे स्वरूप गगनाला भिडले.
पुण्यनगरीचे ग्रामदैवत मानाचा पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ह्यावर्षी ‘श्री. क्षेत्र सिद्धटेक देवस्थानचे’ प्रतीकात्मक स्वरूप देखावा म्हणून सादर करणार आहे. अष्टविनायकांपैकी एक हे म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती, ह्या मंदिराला वेगळा असा इतिहास आहे.
ह्यावर्षी श्रींची आगमन मिरवणूक सकाळी ८:१५ मिनिटांनी उत्सव मंडपातून गाजत वाजत सुरू होईल.
श्रींची प्राणप्रतिष्ठापना कण्हेरी मठ, कोल्हापूरचे माठाधिष श्री. काड सिद्धेश्वर महाराज, ह्यांच्या हस्ते शनिवार दि.०७ सप्टेंबर, २०२४ रोजी, सकाळी ११:३७ मिनिटांनी श्री.कसबा गणपती उत्सव मंडपात संपन्न होणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे, मंडळाचे विश्वस्त, सभासद आणि कार्यकर्ते ह्यावेळी उपस्थित असतील.