अलार्ड विद्यापीठाचे कुलपति डॉ.एल.आर.यादव यांचे मत
अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा २० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
पुणे : “आयुष्यात कधीही हार मानू नका, व्यक्तीच आयुष्य चढ उतारांनी भरलेले असते. परिस्थिती नेहमीच सारखी नसते. कधी तो यशाच्या शिखरावर तर कधी त्याला अपयशाला समोर जावे लागते. त्यामुळे जीवनात आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवला पाहिजे. जे सतत प्रयत्न करतात ते कधीही हरत नाहीत.”असे मत अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अलार्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. एल.आर.यादव यांनी मांडले.
शहरातील मारूंजी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन्सचा २० वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. एल.आर.यादव बोलत होते.
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या कोल्हापूर टस्कर्स क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अलार्ड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पूनम कश्यप, अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. आर.एस.यादव, विद्यापीठातील विविध विभागाचे डीन डॉ. त्रिपाठी, डॉ. जैन, डॉ. सपाटे, डॉ. आशीष दीक्षित आणि डॉ. सोनिया उपस्थित होत्या.
डॉ. एल.आर. यादव म्हणाले,” परिश्रम करणे, निरोगी स्पर्धेत सहभागी होणे, सहकार्य करणे आणि संयम राखणे ही मूल्ये व गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजेत. जीवनातील प्रतिकूल काळात शिक्षक आणि पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांना कठोर परिश्रम पुढे घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करावे लागते आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे मूल्य समजून घ्यावे लागेल.”
राहुल त्रिपाठी म्हणाले,” विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार विकसित करावा. अपयशाच्या वाटेवर चालल्यानेच यश मिळते. वारंवार अपयशी झाल्यानंतर यशस्वी होण्यासाठी संयम, सहकार्य आणि स्वतःवर विश्वास ठेवून सतत काम करत राहिले पाहिजे.”
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या,” विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे असे समजावे. जीवनात यश मिळविण्यासाठी धैर्य आणि चिकाटी महत्वाची आहे.”
डॉ. अननिया अर्जुना यांनी आपल्या भाषणात ट्रस्टच्या अनोख्या प्रवासाचे कौतुक केेले. यशस्वी होण्यासाठी टीमवर्क किती महत्वाचे आहे हे सांगितले.
स्थापना दिनाची शोभा वाढविण्यासाठी अलार्ड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी महिला सक्षमीकरणावर आधारित एक अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण ही केले.