भारतातील ३४ दशलक्ष जनता म्हणजे लोकसंख्येच्या अडीच टक्के हिस्सा नेत्रहीन म्हणजेच भारतातील आर्थिक उत्पादन क्षमतेचे ६४६ अब्ज रुपयांचे नुकसान
– स्पेशल केयर गोल्डची ब्रेल आवृत्ती सादर करत ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात अपंगत्व असलेल्यांसाठी खास तयार केलेली सर्वसमावेशक संरक्षक सुविधा
– दीर्घकालीन सर्वसमावेशकता आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांद्वारे नेत्रहीन व्यक्तींना विमा क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून सक्षम करणार
मुंबई, ४ सप्टेंबर २०२४ – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं. लि. (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल विमा कंपनीने आज या क्षेत्रातील पहिलीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केल्याचे जाहीर केले. सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी विमा योजना उपलब्ध करून देण्याची स्टार हेल्थची बांधिलकी यातून दिसून आली आहे. यामुळे नेत्रहीन समाजाला योग्य माहिती मिळवून देत आरोग्य व विम्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. स्टार हेल्थने वैविध्यपूर्ण आणि आर्थिक सर्वसमावेशकता मोहीम आखत भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींना उत्पन्नाच्या संधी देण्याचे ठरवले आहे. कंपनी समाजातील वंचिक, दुर्लक्षित वर्गाला प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण देऊन त्यांना आरोग्य विमा प्रतिनिधी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याची चांगली बाजू अशी, की यामुळे त्यांना हव्या त्या पद्धतीने, परिचित वातावरणात काम कराता येईल आणि आपल्या आयुष्याची सूत्रे हातात घेता येईल
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय म्हणाले, ‘आम्हाला ब्रेलमध्ये ‘स्पेशल केयर गोल्ड’ ही योजना लाँच करताना आनंद होत आहे. हा समाजाच्या सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना आरोग्य विमा घेण्याची समान संधी मिळावी या आमच्या मिशनमधला महत्त्वाचा टप्पा आहे. ही योजना पारंपरिक विमा योजनांपलीकडे जाणारी आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेप्रमाणे पाठिंबा आणि विमा कवच मिळावे यासाठीची आमची बांधिलकी जपणारी आहे. आम्ही सर्वांना सामावणारा विमा उद्योग तयार करण्यासाठी विशेषतः भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींचा समावेश करण्यासाठी बांधील आहे. इर्डाच्या ‘सर्वांसाठी विमा’ या तत्वाशी सुसंगत राहात आम्ही दर्जेदार आरोग्य विमा पुरवून या क्षेत्रात जास्त लोकशाही आणण्याबरोबरच समाजातील या वंचित वर्गासाठी उत्पन्नाच्या शाश्वत संधी तयार करत आर्थिक सर्वसमावेशकतेचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ही चळवळ पुढे नेण्यासाठी श्रीकांथ बोल्ला यांच्याइतकी योग्य व्यक्ती कोण असेल?’
बोलंट उद्योगाचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष श्री. श्रीकांत बोल्ला म्हणाले, ‘दिव्यांग या नात्याने विविध आव्हानांचा सामना करणारी व्यक्ती या नात्याने मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे त्यांनी लाँच केलेल्या या पहिल्या आणि सर्वसमावेशक विमा योजनेबद्दल अभिनंदन करतो. स्पेशल केयर गोल्ड ही केवळ एक ब्रेलमधली विमा योजना नसून ती सक्षमता आणि समान संधी देणारी आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींनाही आपले आरोग्य जपण्याचा इतरांइतकांच आधार असतो याची दखल घेत समाजात खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी व माझे कुटुंबीय स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ग्राहक असून आता मी स्टार हेल्थचा नोंदणीकृत आरोग्य विमा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आता स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी उत्सुक व मदतीच्या शोधात असलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’
प्रसिद्ध उद्योजक श्री. श्रीकांत बोल्ला हे अंध उद्योजक आणि बोलंट उद्योगाचे सह- संस्थापक आहेत. त्यांच्यासह स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय लाँचप्रसंगी उपस्थित होते.
स्पेशल केयर गोल्ड योजना दिव्यांग व्यक्तींच्या (पीडब्ल्यूडी) गरजा पूर्ण करण्यासाठी खास बनवण्यात आली आहे. २०१७ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतातील ३४ दशलक्ष जनता किंवा लोकसंख्येचा २.५ टक्के हिस्सा नेत्रहीन असल्याचे जाहीर केले होते. २०२२ मध्ये इंडियन जर्नल ऑफ ऑप्थमॉलॉजीने तयार केलेल्या अभ्यास अहवालानुसार दृष्टीदोषामुळे उत्पादनक्षमतेत ६४६ अब्ज रुपयांचे नुकसान होत असून दरडोई नुकसान ९१९२ रुपये आहे. ही विमा योजना या महत्त्वाच्या, परंतु दुर्लक्षित राहिलेल्या वर्गाच्या सर्वसमावेशक आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करणारी आहे. स्पेशल केयर गोल्डमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्सची सर्वांना विशेषतः ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांसह सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य विमा पुरवण्याची बांधिलकी दिसून आली आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्सने नव्याने भरती केलेल्यांना सर्वसमावेशक सहाय्य करण्याचे ठरवले असून दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्या संपूर्ण तयारीचा खर्च, ऑडिओ प्रशिक्षण आणि लेखक पुरवले जाणार आहेत. एजंट्ससाठी खास हॉटलाइन क्रमांक तयार करण्यात आला असून त्याद्वारे आवश्यक ती मदत आणि शंकानिरसन केले जाईल. हा उपक्रम वंचित वर्गाला त्यांच्या सोयीनुसार काम करता यावे, उत्पन्न निर्णिती व्हावी या हेतूने तयार करण्यात आला आहे.
स्पेशल केयर गोल्ड विमा योजनेची ब्रेल आवृत्ती नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड (एनएबी) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ही विमा योजना ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात अपंगत्व- शारीरीक, सेन्सरी किंवा आकलनात्मक असलेल्या व्यक्तींना खास विमा कवच पुरवते. त्यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पूरक सेवांचा समावेश आहे.