प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा ‘गुंगे-गुड्डे’ उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत

Date:

मुंबई-सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसच्या गुंगी गुडिया या वक्तव्याचा खुलासा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल केला आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात जरी नवीन असल्या तरी त्यांच्या दोन्ही कुटुंबामध्ये राजकारण आहे. पण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगले त्यावर काँग्रेसने टीका केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यात होणाऱ्या घटनांकडे आहे. पत्रकारांनी जर धनंजय मुंडे संदर्भात प्रश्न विचारला हे आपण जर स्वीकारले तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाष्य केले असते तर ते योग्य झाले असते.संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या जागी जर कोणी पुरुष मंत्री असता किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटले असते. राजकारणात टीका सहन केल्या पाहिजे आणि यापुढे तशा चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले जात होते पण त्यांनी सिद्ध केले की मी स्वतंत्र बाण्याची व्यक्ती आहे. सरकारमध्ये असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावर बोलणं टाळतात. यामध्ये स्त्री-पुरुष भेद करणे टाळतात. हा काही स्त्रीचा अपमान आहे असे मला वाटत नाही कारण त्या घटनात्मक पदावर बसले आहात. गुंगी गुडिया काही असंवैधानिक शब्द नाही.

संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्यावर कोणी टीका केलेली नाही. ती टीका उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून केली आहे. शब्द जपून वापरायला पाहिजे हे जरी खरे असले तरी हा काही त्यांचा अपमान नाही. सुरज चव्हाण यांनी केलेले आंदोलन चुकीचे आहे. इंदिरा गांधी यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली होती पण त्यांनी मी गुंगी गुडिया नाही हे सिद्ध केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाज शरम वाटू द्या, त्या नालायकांना माफी मागायला लावा किंवा पदावरून हटवा अन्यथा मोठे आंदोलन – संजय काकडे

‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवर संजय काकडे आक्रमक; सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी राहुल...

धरणक्षेत्रात यंदा पावसाची दमदार आघाडी; मुळशीत सर्वाधिक ५,८८८ मिमी पाऊस

टेमघरमध्ये २४ तासांत ३५ मिमी पावसाची नोंद; सर्व १६...

चारही धरणे १०० टक्के भरली; गतवर्षापेक्षा ३.२३ टीएमसी अधिक पाणीसाठा

खडकवासला धरणातून ८ हजार ७७७ क्युसेक्स विसर्ग; चारही धरणांत...