पुणे, दि. ३: मुख्यालय दक्षिणी कमान, पुणे येथील आशा स्कूल मध्ये स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट व ऑफिस सुपरिंडेंट ही पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची असून इच्छुकांनी ८ सप्टेंबर पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
उमेदवारांनी मानसशास्त्रज्ञ पदासाठी मास्टर ऑफ आर्ट्स सायकोलॉजी (क्लिनिकल सायकोलॉजीमधील स्पेसलायझेशन), स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट व फिजिओथेरपिस्टसाठी संबंधित क्षेत्रातील पदवीधर, पदव्युत्तर पदवी तसेच ऑफिस सुपरिंडेंट पदासाठी संगणकीय मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ज्ञान सह संबंधित क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. सर्व पदांकरीता उमेदवार आरसीआयचे नोंदणीकृत उमेदवार असावेत.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती स्वत: प्रमाणित करून कार्यालयीन प्रभारी, आशा शाळा, ८ जिजामाता मार्ग, मुख्यालय पुणे, उप क्षेत्राजवळ, पुणे कॅन्टोन्मेंट-१ येथे नोंदणीकृत पोस्टाने किंवा ashasc93@gmail.com या ई-मेल ॲड्रेसवर सादर करावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ७७७०००४५३८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै.(नि.) यांनी केले आहे.