पुणे-खुनी हल्ल्यातील अट्टल गुन्हेगाराला पाठलाग करून चतु:शृंगी पोलीसांनी पकडले आहे. रोहित उर्फ भोऱ्या मधुकर शिंदे, वय 21 वर्ष रा. दुसरा कॅनॉल, पांढरस्थळ, गणपती मंदिराजवळ, उरळीकांचन असे या आरोपीचे नाव असून खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०३/०९/२०२४ रोजी चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गस्त करत असताना सपोनी नरेंद्र पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की येरवडा पोलीस स्टेशन कडील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील WANTED आरोपी भोऱ्या शिंदे हा सोमेश्वरवाडी पाषाण पुणे येथे आला आहे, अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती दिली असता त्यांनी त्यास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदर दुशिंग, पोलीस शिपाई पालांडे, भांगले, खरात व तरंगे यांनी सोमेश्वर वाडी पाषाण पुणे येथे सापळा रचून रोहित उर्फ भोऱ्या मधुकर शिंदे, वय 21 वर्ष रा. दुसरा कॅनॉल, पांढरस्थळ, गणपती मंदिराजवळ, उरळीकांचन, पुणे यास शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपीने त्याचा गुन्हेगार मित्र सुधीर गवस याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या इतर साथीदारांसह हातामध्ये कोयते घेऊन येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन खुनाचा प्रयत्न केला होता. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु र क्र ४९०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,३२४(४),३(५) सह आर्म ॲक्ट कलम ४(२५) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल आहे.आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. आरोपीस वर गुन्ह्याच्या पुढील तपासकामी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीवर गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, स. पो. नि. नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पो हवा दुशिंग, पवार, पो शि पालांडे, भांगले, खरात, तरंगे, मपोशि कुंभार यांनी केली आहे.