नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२४ – महिंद्रा ट्रॅक्टर्स या भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडने आपला पहिला सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायो- गॅस) पॉवर्ड युवो टेक+ ट्रॅक्टर श्री. नितिन गडकरी, माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे लाँच केला आहे.कॉम्प्रेस्ड नैसर्गिक गॅस वापरत महिंद्रा सीबीजी पॉवर्ड ट्रॅक्टटरने ट्रॅक्टर तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे प्रदूषक घटक व कार्बन उत्सर्जन कमी होते. जीवाश्म इंधनावर अवलंबून असलेल्या सीएनजीच्या तुलनेत कॉम्प्रेस् बायो- गॅस हरित, अक्षय इंधन असून ते जीवाश्व इंधनावरील अवलंबित्व कमी करते. हा गॅस विघटनशील घटक उदा. शेती खाद्यपदार्थ आणि इतर प्रकारच्या कचऱ्याचे विघटन करून बनवला जातो.
महिंद्राचे युवो टेक + सीबीजी ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल तंत्रज्ञानाच्या तुलनेत जास्त ताकद आणि चांगली कामगिरी देत असल्यामुळे शेती व इतर माल वाहतुकीचे काम चांगल्या प्रकारे करता येते. महिंद्राचा नवीन सीबीजी ट्रॅक्टर सर्व भारतीय नियमांचे कठोर पालन करतो.
पर्यावरणपूरक शाश्वत तंत्रज्ञान सुविधांचा प्रसार करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत सीबीजी ट्रॅक्टर तंत्रज्ञानाने शेतकरी समाज आणि पर्यावरणाला लाभ करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. महिंद्रा आपली नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उत्पादनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी बांधील आहे. कंपनीने सीएनजी ट्रॅक्टर, एलपीजी ट्रॅक्टर आणि ड्युएल- फ्युएल ट्रॅक्टर तंत्रज्ञान यांसारखे पर्यायी इंधन ट्रॅक्टर तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत लाँच केले आहे.