पुणे-
मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने आज कोहिनूर चौक, कॅम्प येथे सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,आबा बागुल,बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी,आमदार रविंद्र धंगेकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘सिंधुदुर्गसारख्या महत्वाच्या किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा तर तज्ञांची मदत घ्यायला हवी होती, परंतु मिंध्यांनी टक्केवारीसाठी शिवरायांनाही सोडले नाही. ठाण्यातील कंत्राटदाराला पुतळ्याचे काम दिले होते. पुतळ्याच्या निर्माणकार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचे घेणे देणे नाही. कमिशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढेच काम निष्ठेने सुरू आहे. तीन शतकानंतरही सिंधुदुर्ग छातीचा कोट करून समुद्रात उभा आहे. पण मिंधे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट येथे उभारलेला शिवरायांचा पुतळा वाऱ्याच्या झोताने कोसळला. लोकसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याच्या हेतूमुळे स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिले गेले नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येक प्रतिमा जपायला पाहिजे.’’
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे आदींनीही भाषणे केली.
यावेळी संगीता तिवारी, दत्ता बहिरट, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, अजित दरेकर, मुख्तार शेख, अविनाश साळवे, सतिश पवार, मुन्नाभाई शेख, भीमराव पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, असिफ शेख, राजेंद्र शिरसाट, वाहिद निलगर, अमित घुले, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे, नुर शेख, लतेंद्र भिंगारे, संगीता पवार, सुरेखा खंडागळे, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, बेबी राऊत, माया डुरे, रजिया बल्लारी, सीमा सावंत, सुंदर ओव्हाळ, छाया जाधव, संगीता क्षिरसागर, सोनिया ओव्हाळ, मीरा शिंदे, हर्षद हांडे, मिलिंद अहिर, विठ्ठल गायकवाड आदींसह महाविकास आघाडीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.