खेड-आळंदी-चाकण परिसरातील विकासाला गती देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. गोऱ्हे यांची भेट

पुणे.दि.२: खेड-आळंदी-चाकण परिसरातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून, स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येईल असे आश्वासन शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी डॉ. गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी या भागातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळात शासनाच्या अधिकाधिक योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत महिला शेतकरी ओळखपत्राचा अधिकाधिक लाभ मिळावा, महिला बचत गटांना शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, तसेच बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

याखेरीज, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजनांचा पाठपुरावा व चाकण औद्योगिक परिसरातील स्थानिक नागरिक आणि कामगारांना भेडसावणारे एमआयडीसीमधील विविध प्रश्न उद्योग विभागाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच, या भागातील विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

या भेटीप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, खेड तालुकाप्रमुख निलेश पवार, उपतालुकाप्रमुख दत्ताभाऊ राऊत, माजी उपसरपंच शरद जठार, सचिन लांडगे, खेड तालुका महिला आघाडी प्रमुख श्रद्धा सांडभोर, महिला आघाडीच्या सुषमा सांडभोर, उपसरपंच मोनिका जठार, सुवर्णा थिगळे, कल्पना म्हस्के, हेमलता भोपे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला सुरक्षेसाठी कडक कायद्यांसोबत जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य : डॉ. नीलम गोऱ्हे

दिल्ली प्रकरणी तातडीच्या न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री...

सिंहगड रोड हिंगणे ते सहकारनगर सातारा रोड वाहतुकीसाठी बोगद्याच्या पर्यायी मार्गाची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून पूर्वपाहणी

नागरिकांना सुरक्षित व सुलभ दळणवळणाची सुविधा देण्यासाठी महापौरांचा पुढाकार पुणे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह

हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर ना. चंद्रकांतदादा पाटील यांची...

गणेशोत्सव मंडळांमध्ये पोहोचून महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

विमाननगर, चंदननगर, वडगाव शेरी व खराडी परिसरातील विविध मंडळांना...