नदी सुधार प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करा – ना. चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे : सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.ना. पाटील यांनी आज सीओईपीमधील मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांची तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बोट क्लब परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सीओईपीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, सीओईपी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष विनायक पै, कुलसचिव डी. एन. सोनावणे, अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. पराग सदगिर, विद्यार्थी संघटनेचे माजी सदस्य जगदीश कदम, डॉ. राजेंद्र हिरेमठ, भरत गिते,
विवेक पवार; तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उपअभियंता उमेश शिद्रुक आदी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान कुलगुरू डॉ. भिरुड यांनी मुलींच्या वसतिगृहाची विद्यमान क्षमता ९००, तर मुलांच्या वसतिगृहाची क्षमता १,२०० असल्याची माहिती दिली. स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आराखडा व अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले.

यानंतर त्यांनी सीओईपीमधील बोट क्लब परिसराची पाहणी करून नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या नवव्या टप्प्यातील जमीन अधिग्रहणासंदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे काम स्थगित असल्याची माहिती दिली. त्यावर महापालिका आयुक्तांशी चर्चा करून संबंधित अडचणी दूर करण्यात येतील, असे सांगत प्रकल्पाचे काम कोणताही विलंब न लावता तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खेड-आळंदी-चाकण परिसरातील विकासाला गती देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार डॉ. नीलम गोऱ्हे

खेड-आळंदी-चाकण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. गोऱ्हे यांची भेट पुणे.दि.२:...

पुण्यासाठी २५ टीएमसी पाण्याची मागणी; महापौर मंजुषा नागपुरेंची जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा

धायरीतील दोन पुलांना तातडीने एनओसी, मुळा-मुठा पुनरुज्जीवन मिशन आणि...

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

बारामती, दि.२: महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या...

नैसर्गिक हिऱ्यांइतकीच दुर्मीळ मैत्री; डी बिअर्सची ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ मोहीम

फ्रेंडशिप डेनिमित्त नऊ शहरांतील ६० स्टोअर्समध्ये खास अनुभव; पुण्याचाही...