पुणे- पुण्याचे नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल झालेली हत्या हि पूर्वनियोजित कटाचाच भाग असल्याचे समजते असून हत्येपूर्वी घराबाहेर आपल्या एका सहकाऱ्याबरोबर ते उभे असताना सुमारे ४/५ दुचाक्यांवरून १२ ते १३ जन आले आणि फायरिंग करत , कोयत्याचे वार करून त्यांची निघृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मारेकरी आल्याचे, आणि त्यांनी हल्ला केल्याचे एका सीसी टीव्ही फुटेज ने स्पष्ट केले असून आता या मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांना शोधून काढण्याचे अथःक प्रयत्न पुणे पोलिसांनी सुरु केले आहेत त्यामुळे लवकरच मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडण्याची चिन्हे आहेत .
वनराज आंदेकर माजी नगरसेवक होते आणि ते शांत स्वभावाचे म्हणूनच सर्वांना परिचित होते .ते जरी आंदेकर यांच्या कुटुंबातील सदस्य होते तरी जनमानसात त्यांची प्रतिमा चांगलीच होती. असे असताना त्यांची अशा प्रकारे हत्या होणे हि बाब गुन्हेगारी क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात देखील गंभीर मानली जाते आहे .अल्पना सिनेमागृहा नजीकच्या , गणेश पेठेतील मासे आळीतील दुकाने त्यांचे हप्ते , वाहन तळाचे पैसे नेमके यापूर्वी कोण गोळा करत होते आणि सध्या कोण गोळा करते आहे यावर आता काही पोलिसांनी फोकस करून त्या अनुषंगाने तपास करायला सुरुवात केल्याचे वृत्त आहे .
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत झाले आहे. यामध्ये 5-6 दुचाकींवर आलेले सुमारे १२ /१३ तरुण एकाच वेळी आंदेकर यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. हल्लेखोर आंदेकरजवळ पोहोचताच. आंदेकर मागे पळतानाही यात दिसत आहे. दरम्यान, एका हल्लेखोराने आंदेकर यांच्या कानाजवळ गोळी झाडली. आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोराने बंदूक हवेत फिरवत गोळीबार केला. यानंतर सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला.सूत्रांच्या माहिती नुसार , हल्लेखोरांनी आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला होता. परिसरातील वीज बंद करण्यात आली. लाईट नसल्यामुळे आंदेकर बाहेर रस्त्यावर एकटेच उभे होते. हल्लेखोरही कोयते, पिस्टल घेऊन घटनास्थळी पोहोचले होते.वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. याआधी त्यांची आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये दोन वेळा नगरसेवक होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलत भाऊ उदयकत आंदेकर हे देखील नगरसेवक होते. याशिवाय त्यांची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर राहिल्या आहेत. वनराज आंदेकरचे वडील सूर्यकांत आंदेकर उर्फ बंडू हा या टोळीचा म्होरक्या होता . गुंड प्रमोद माळवदकर खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता.आंदेकर टोळी आणि माळवदकर टोळी यांच्यातील टोळीयुद्धाचा इतिहास या शहराला आहे. सूर्यकांत आंदेकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुर्यकांत आंदेकर आणि अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी सुर्यकांत आंदेकर (वय ६८ ) यांची फिर्याद नोंदविली आहे . वनराज च्या सांगण्यावरून अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याच्या समजावरून १० जणांनी पिस्तुल आणि धारदार शस्त्राने हल्ला करून वनराज ला जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते 9923193088 अधिक तपास करत आहेत.