पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस श्याम सदाफुले, नगरसेवक निलेश भाऊ आल्हाट, अर्जुन आल्हाट, बसवराज गायकवाड, शशिकांत मोरे, रवी अवसरमल, निलेश रोकडे, सुनील खुडे, सचिन डोळसे, भीमा चलवादी, अमित पाटोळे, मंगल राजगे, शोभा झेंडे, संजय गायकवाड, रावसाहेब कसबे, मोहन जगताप, सुदर्शन कांबळे, गौतम कदम, संतोष खरात, कृष्णा खिल्लारे, क्रिस्टोफर राजमाननी, वसंत वाघमारे, अक्षय अवसरमल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या साहित्य आणि कार्यातून समाजातील वंचित, शोषित घटकांना प्रेरणा मिळत असून त्यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

