पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याची लढाई जहालवादी करून या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये बहुमूल्य योगदान दिले. त्याचप्रमाणे दीड दिवस शाळेत जाऊन अ्णाभाऊ साठे यांनी प्रचंड मोठे साहित्य निर्माण करून सामाजिक चळवळीला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा रशियामध्ये सर्व प्रथम गाणारे अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन.’’
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, चंद्रशेखर कपोते, राहुल वंजारी, समद शेख, राजाभाऊ कदम, गुलामहुसेन खान, बबने गोल्डे, गणेश गुगळे, नरेश आवटे, डोंगरे, सुरेश नांगरे, फैय्याज शेख, संजय डोंगरे आदी उपस्थित होते.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्तपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन.
Date:

