पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आज त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. पुण्याच्या के इ एम रुग्णालयात त्यांना नेले असता तिथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदेकर यांची अशा पद्धतीने हत्या झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हा चिंतेचा विषय होणार आहे
राष्ट्रवादी पक्षाकडूनउमेदवारी मिळवून वनराज आंदेकर हे २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते . नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांची अत्यंत शांत नगरसेवक अशीच गणना होत होती . आज नाना पेठेत त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करून ४ ते ५ जन पळून गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे..
आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरगुती वादातून वनराज आंदेकर बंडु आंदेकर चा जावई आणि वनराजचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे . गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अॅसिड हल्ला केला.अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते आहे .पुणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून नगरसेवक म्हणून निवडून आले . त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते. वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचे महापौरपद भुषविले आहे.
केइएम रुग्णालयातून आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पोस्टमार्टेम साठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .