स्वप्नील दुधाने यांनी दिली ११ रस्त्यांची यादी ….
पुणे- रस्ते खड्डे ,पाणी या समस्यांनी पुणे महापालिकेतील सत्ता उलथवून टाकल्याचा इतिहास आहे . तत्कालीन अधिकारी बोनाला यांनी BRT रस्त्यांचे असे काही करून ठेवले होते कि, अजितदादांनी त्याचा फायदा घेत सबसे बडा खिलाडी ची सत्ता देखील उलथी पालथी केल्याचे पुण्याने पाहिले आहे.अगदी आता याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतूक समस्येने अक्राळविक्राळ स्वरूप प्राप्त केले आहे. कोथरूड हा जो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो जिथे केंद्रीयमंत्री , राज्याचे मंत्री ,खासदार , आमदार सारे कोणी कोणी आहेत तिथे रस्त्यांच्या दुरावास्थेने लोकांना त्रासून सोडले आहे.हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी चे अर्बन सेल शहर प्रमुख स्वप्नील दुधाने यांनी काल पुणे मनपाचे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेतली आणि आपल्या कोथरूड मतदार संघामधील ४० फूट अर्थात १२ मीटर रुंदीच्या पुढील रस्त्यांच्या दुराव्यवस्थेबद्दल माहिती देऊन ..साहेब त्वरा करा … जलदगतीने सुवास्थित रस्ते द्या ..अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा दिला आहे.
दुधाने म्हणाले ,’कोथरूड विधानसभा मतदारसंघात या महत्वाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचसह सायंकाळी या रस्त्यांवर यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मतदारसंघातील अशा रस्त्यांची एक यादी तयार करून ती मनपाच्या पथ विभागाला सुपूर्द करण्यात आली. सदर रस्त्यांचे काम त्वरित पूर्णत्वास नेणे आवश्यक असून लवकरात लवकर मनपा प्रशासनाने यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.याप्रसंगी माझ्यासमवेत माझे सहकारी कार्यध्यक्ष जयेश मुरकुटे आणि युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी उपस्थित होते. या कामास लवकरात लवकर पूर्ण न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा शाराही देण्यात आला. यावेळी पावसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हा प्रश्न निवारीत करण्याचा शब्द दिला आहे.
हे आहेत ते ११ रस्ते
१) कर्वेनगर मधील डी मार्ट ते वरघडे चौक १२ मीटर रस्ता
२) कोथरुड मधील शास्त्रीनगर पोलिस चौकी ते आशिष गार्डन पर्यंततील मुख्य रस्ता
३) गुजरात कॉलनी, कोथरुड मधील मुख्य रस्ता
४) जयभवानी नगर समोरील मुख्य डी.पी. रस्ता (शिवतीर्थ नगर कमानी समोरुन आनंदनगर मेट्रो स्टेशनकडे जाणार रस्ता)
५) कर्वेनगर मावळे आळी येथील मुख्य कॅनॉल रस्ता
६) कर्वेनगर शाहु कॉलनी लेन नं. १ मधील १२ मीटर रस्ता
७) बाणेर स्माशनभुमी ते ज्युपीटर हॉस्पिटल रस्ता
८) मुख्य बलेवाडी फाटा येथील रस्ता
९) बालेवाडी फाटा ते बालेवाडी गावठाण कडे जाणारा मुख्य रस्ता (कपिल रेसिडेन्सीसमोर)
१०) बाणेर येथील वाडकर चौकामधील मुख्य रस्ता
११) बाणेर येथील मारुती ननावरे चौक रस्ता.