पुणे:
पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला भगिनींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा केला जाणार आहे. तसेच खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या महिला मेळाव्यामध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर हे कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने साडी भेट म्हणून दिली जाणार असून इतर अनेक आकर्षक बक्षिसे या कार्यक्रमात जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तरी पर्वती विधानसभा मतदारसंघ व परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी आपल्या भावाच्या आमंत्रणाचा स्वीकार करत या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन भिमाले यांच्यावतीने करण्यात आले आहे.