Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना  

Date:

टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुपने केली  बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना  – हा भागीदारी उद्यम ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी इनोव्हेशनला चालना देईल

·         हा भागीदारी उद्योग ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरमध्ये नावीन्य आणेलयामध्ये बिझनेस आयटीसाठी सॉफ्टवेयरडिफाइन्ड वेहिकल्स (SDV) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स यांचा समावेश आहे.

·         स्ट्रॅटेजिक इंडियन टॅलेंट सेंटर्स – पुणेबंगलोर आणि चेन्नई – बीएमडब्ल्यू ग्रुपच्या सॉफ्टवेयर आणि आयटी हबच्या जागतिक नेटवर्कचा भाग बनतील.

·         २०२५ च्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत चारअंकी वाढ करण्याची योजना आहे.

म्युनिचजर्मनी आणि पुणे २०२४:  उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी जागतिक कंपनीटाटा टेक्नॉलॉजीज आणि जगातील आघाडीच्या प्रीमियम ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एकबीएमडब्ल्यू ग्रुपने मिळून बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा भागीदारी व्यवसाय सुरु केल्याची अधिकृत घोषणा केली आहेकरारांवर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेतआता हा भागीदारी व्यवसाय पुणेबंगलोर आणि चेन्नईमध्ये प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये १०० कर्मचाऱ्यांसह संचालन सुरु करेलहा उद्योग वेगाने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे२०२५ च्या अखेरपर्यंत चार अंकी कर्मचाऱ्यांसह पुढे जाण्याची योजना आखण्यात आली आहेकर्मचाऱ्यांमध्ये भारतातील अव्वल अभियांत्रिकी प्रतिभावंतांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला गेला आहेया भागीदारी व्यवसायामध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीज या दोघांकडे ५०शेयर्स आहेतही भागीदारी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान  बिझनेस आयटीमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते.

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया अत्याधुनिक वाहनांसाठी सहजसुलभस्केलेबल सॉफ्टवेयर सोल्युशन्स तयार करून आणि अधिक चांगला डिजिटल अनुभव प्रदान करून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक धोरणासाठी पूरक ठरेलसंकल्पना तयार करण्यापासून सर्वसमावेशक अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंतसंपूर्ण उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या क्षमता बीएमडब्ल्यूच्या भविष्यासाठीच्या मोबिलिटी सोल्युशन्ससाठी प्रमुख सॉफ्टवेयर योजनांमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देईल आणि भारतातील प्रभावशाली प्रतिभावंतांपर्यंत पोहोचणे सोपे बनवेल.

भारतातील इंजिनीयरजगासाठी‘ हा सिद्धांत या भागीदारी व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरेलभारतातील असामान्य अभियांत्रिकी  आयटी प्रतिभावंत एसडीव्हीऑटोमेटेड ड्रायव्हिंगडिजिटल इन्फोटेन्मेन्ट आणि ऑटोमोटिव्ह डिजिटल सेवांसाठी धोरणात्मक सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतीलऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरव्यतिरिक्तहा भागीदारी व्यवसाय बीएमडब्ल्यू ग्रुपच्या बिझनेस आयटीसाठी डिजिटल नावीन्य प्रदान करेलपरिणामीबीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया या कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळवून देईल आणि त्यासोबतच डिजिटल कस्टमर जर्नी  विक्री प्रक्रियांना मजबूत करेलएआय ऍप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या विकासावर भर दिला जाईलत्यामुळे सर्व प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा वेग  कार्यक्षमता वाढेल.

हा भागीदारी व्यवसाय युवा भारतीय प्रोफेशनल्सना अशा तंत्रांवर काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो, जो जागतिक स्तरावर मोबिलिटीच्या भविष्याला आकार देईल. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह नावीन्यांना नवे रूप देण्याप्रती या व्यवसायाची बांधिलकी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान इकोसिस्टिममध्ये ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताची ओळख मजबूत करते. महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत भागीदारी व्यवसायाचा भाग बनण्यासाठी आणि जागतिक प्रभाव निर्माण करणाऱ्या सोल्युशन्सना नवे रूप देण्यासाठी याठिकाणी अर्ज करू शकतात.

बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस यांनी सांगितलेभारतात टाटा टेक्नॉलॉजीज ब्रँडचे स्थान मजबूत आहेत्याचा लाभ घेत हा भागीदारी व्यवसाय अव्वल प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि मोबिलिटीच्या भविष्याची नवी व्याख्या रचणारी दूरदर्शी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी एक मंच प्रदान करेल.  प्रीमियमसॉफ्टवेयरसंचालित गाड्यांच्या अभियांत्रिकीडिजिटल अनुभवांना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या यात्रेला वेग देण्यासाठी बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” 

टाटा टेक्नॉलॉजीजचे ऑटोमोटिव्ह सेल्सचे अध्यक्ष श्री नचिकेत परांजपे यांनी सांगितले, “ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाचा वेगवान विकास वाहनांचा विकास घडवून आणण्याच्या पद्धती बदलत आहेया बदलामध्ये सॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्या सर्वात पुढे आहेतटाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आमची सखोल ऑटोमोटिव्ह विशेषज्ञता आणि मूल्य शृंखलेमध्ये एंडटूएंड सोल्युशन्स – संकल्पना आणि तपशीलवार अभियांत्रिकीपासून उत्पादन अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत – आम्हाला मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्यात बीएमडब्ल्यू ग्रुपचे समर्थन करण्यासाठी पूर्णपणे तयार करतातया भागीदारी व्यवसायामार्फत आम्ही ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या सीमा ओलांडून पुढे जाऊअशा गाड्या बनवू ज्या आधुनिक असतीलइतकेच नव्हे तरजगभरातील ग्राहकांना असामान्य ड्रायव्हिंग अनुभव देखील प्रदान करतील.”

बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेयरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट क्रिस्टोफ ग्रोट यांनी सांगितले, “बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा आमच्या जागतिक वेहिकल सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट उपक्रमांचा एक लक्षणीय भाग आहेभारतातील सॉफ्टवेयर प्रतिभावंत आमच्या भविष्यासाठीच्या सॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्यांसाठी खूप मूल्यवान ठरतीलगतिशील प्रक्रिया आणि अत्याधुनिक टूल्स यांच्यासह बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियामधील भारतीय अभियंते नाविन्यपूर्ण ऑटोमोटिव्ह डिजिटल अनुभव जसे कीऑटोमेटेड ड्रायव्हिंग आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम्स इत्यादी निर्माण करतील.”

बीएमडब्ल्यू ग्रुप आयटीचे सीईओ आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अलेक्झांडर बुरेश यांनी सांगितलेबीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियासोबत आम्ही आमचे आंतरराष्ट्रीय आयटीहब धोरण सातत्याने प्रगत करत आहोत आणि आमच्या ग्लोबल बिझनेस आयटीचा विस्तार करत आहोतटाटा टेक्नॉलॉजीजसोबत आमची भागीदारी धोरणात्मक दृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि आमच्या मूल्य शृंखलेमध्ये नाविन्यपूर्ण सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यासाठी अधिक चांगली परिस्थिती प्रस्तुत करतेबीएमडब्ल्यू ग्रुपच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान प्रतिभावंतांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाचे सीईओ आदित्य खेरा यांनी सांगितले, “बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया सुरु करून आम्ही जागतिक स्तराचे सॉफ्टवेयर हब तयार करत आहोतजे बीएमडब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी धोरणामध्ये प्रमुख भूमिका बजावेलसॉफ्टवेयरडिफाइन्ड गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीजची लीडरशिप आणि त्यांच्या प्रॉडक्ट इंजिनीयरिंग उत्कृष्टता यांना एकत्र आणून आम्ही इनोव्हेशन आणि वृद्धीसाठी तसेच भारतातील अव्वल प्रतिभावंतांना बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मोबिलिटी सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देण्याची संधी देण्यासाठी तयार आहोत.”

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाच्या मॅनेजमेंट टीममध्ये दोन्ही पार्टनर कंपन्यांचे अनुभव एक्झिक्युटिव्ह आहेतटाटा टेक्नॉलॉजीजच्या वतीने आदित्य खेरासीईओ म्हणून तर स्वेता गिरिनाथम सीएफओ आहेतबीएमडब्ल्यू ग्रुपकडून स्टेफन फ्लेडर हे एंटरप्राइज आयटीचे सीओओ आणि ऑलिव्हर शेकल ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरचे सीओओ आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५० हजाराच्या कर्जाने घेतले शेतकरी माय लेकरांचे जीव

गेवराई -कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या‎आडूला दोरीने गळफास...

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११...

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले-जखमींवर उपचाराचा सर्व खर्च...