जमीन मालकाची २ कोटी ६४ लाखांची फसवणूक, बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Date:

पुणे : पुण्यातील बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील तीन फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तुषार गणपत दगडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक रुपेश हरिभाऊ कुंबरे आणि कांचन रुपेश कुंबरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३५१(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये १ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

एफआयआरनुसार, दगडे कुटुंबीयांच्या बावधन बुद्रुक येथील वडिलोपार्जित जमिनीच्या विकासासाठी २०११ मध्ये संबंधित विकासक कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘आर. के. ग्रेसिया’ इमारतीतील काही फ्लॅट जमीन मालकांच्या वाट्याला आले होते. हे फ्लॅट अधिक दराने विकून देण्याचे आश्वासन देत विकासकांनी कुलमुखत्यारपत्र घेतल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एकत्रित हिस्स्यातील फ्लॅट क्रमांक ३०१, ९०२ आणि ११०२ यांची विक्री करून एकूण ५ कोटी २९ लाख ६१ हजार ३०० रुपये प्राप्त झाले. त्यातील स्वतःच्या वाट्याची २ कोटी ६४ लाख ८० हजार ६५० रुपयांची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केली तसेच जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. हा कथित प्रकार २०११ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र एकनाथ आळेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एफआयआरमधील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून पुढील तपास कोथरूड पोलीस करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बृजभूषण सिंह महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोष:दिल्ली न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली-दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सोमवारी महिला कुस्तीपटूंशी संबंधित...

पाच दिवसांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत मेघगर्जना,...

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप होत शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत व्हा : लोसी दिखो

सरहदतर्फे स्व. श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि...