निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे-
राज्यामध्ये दिवसेंदिवस महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या घटना वाढत असून बदलापूर, अकोला, कोल्हापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे… आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे. या परिस्थितीचा आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज कोथरूड कर्वे पुतळा या ठिकाणी इंडिया आघाडीतर्फे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या पक्षांसहित युवक क्रांती दल संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सरकारचे लक्ष सत्तेवर, कायदा – सुव्यवस्था वाऱ्यावर”, “नराधमाला फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या”, ” बहुत हुवा नारी पर वार, डूब मरो खोके सरकार”, ” पैसे नको, सुरक्षा हवी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनामध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने आम आदमी पार्टीच्या आरती करंजावणे, शिवसेनेच्या छाया भोसले, सविता मते, प्रज्ञा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती सूर्यवंशी, मीनल सुर्वे, मनीषा भोसले, संगीता लिंबोळे, काँग्रेसच्या मनीषा करपे, प्राची दुधाने, शारदा वीर यांचा सहभाग होता. राज्यात एक वेळ ‘लाडकी बहीण योजना’ नाही राबवली तरी चालेल परंतु ‘सुरक्षित बहीण योजना’ राबवण्याची गरज यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर बोलून दाखवली. राज्यात बदलापूर पाठोपाठ अकोला, कोल्हापूर सहित गेल्या एक आठवड्यामध्ये किमान दहा ते बारा गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक आहे. राज्यातील गृहमंत्री महिलांना सुरक्षित वातावरण देण्यामध्ये व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरले आहेत, अशी टीका यावेळी इंडिया आघाडीच्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी यांनी केली.
कोथरूडचे माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत मोकाटे यांनी यावेळी राज्य सरकारच्या गलथान कारभारावर टीका केली
यावेळी आम आदमी पार्टीचे डॉ अभिजीत मोरे, अॅड अमोल काळे, माजी नगरसेवक व शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक व काँग्रेस नेते रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वप्निल दुधाने, शिवसेना शहरप्रमुख गणेश थरकुडे, युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष तोंडे, अन्वर राजन यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे अमोल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीश गुरनानी, किशोर कांबळे, राजेंद्र उभे, शिवसेनेचे नेते व माजी नगरसेवक योगेश मोकाटे, राजेश पळसकर, राम थरकुडे, नितीन पवार, किशोर सोनार, जयदीप पडवळ, नंदू घाटे, दिनेश बराटे, अजय भोवड, काँग्रेसचे नेते रविंद्र माझिरे, उमेश कंधारे, किशोर मारणे, राजाभाऊ मगर, विजय खळदकर, यशराज पारखी, भगवान कडू यांनी परिश्रम घेतले.