एकतर पाणी आले 48 तासानंतर त्यातही आढळून आल्या आळ्या.. नागरिकांचे प्रचंड हाल..
पुणे- तळजाई पठार धनकवडीत पाण्याची बोंब सुरु असून त्यात काही ठिकाणी दुषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा आरोप करत येथील पाणीपुरवठ्या कडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले असल्याचा हि आरोप माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी अश्विनी नितीन कदम यांनी केला आहे .
त्या म्हणाल्या गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट ला पुणे शहरामध्ये देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या अनुषंगाने दुरुस्तीचे काम पूर्ण वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना आज शुक्रवार दिनांक 23 रोजी सुद्धा अघोषित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागले. त्यामध्ये तळजाई पठार धनकवडी या परिसरामध्ये पाण्यामध्ये अळ्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अधिकारी फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांनी मला संपर्क केला .विषयाचे गांभीर्य ओळखून आपण तातडीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर संबंधित बाब घालून तातडीने उपाययोजना करण्यास सांगितल्या आहेत . नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा प्रकारचा पाणीपुरवठा सुरू राहिला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांना दिला आहे.