Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची महिती देण्यासाठी ऑनलाइन वेबिनार

Date:

विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील साधणार संवाद महिती देण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

मुंबई, दि. २४ : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते १२ यावळेत ऑनलाइन वेबिनार होणार आहे. हा कार्यक्रम http://www.parthlive.com लिंकवरून (यू टयूब) वर सुध्दा थेट (Live) प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाकरिता राज्यातून जवळपास ५ हजार शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनी, पालक व संस्थांचे प्रतिनिधी ऑनलाइन थेट प्रक्षेपणाचा लाभ घेणार आहेत.

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खासगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवगांतील, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नूतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे आर्थोक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,

अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या), आणि महिला व बाल विकास विभागाच्या दि.६ एप्रिल २०२३ नुसार “संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुध्दा शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे.अशा सर्व योजनांची माहिती या वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन

पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था...

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन

पुणे, दि. २८: जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची...