पुणे- पुण्यात गेली काही दिवस सातत्याने पाऊस सुरु आहे, पाहता पाहता , हळू हळू धरणे भरू लागली आहेत . पाटबंधारे विभागाने खडकवासल्याची स्थिती पाहून खरीप हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले , सर्वांना सतर्कतेचा इशाराही दिला, नदीकाठच्या लोकांना , नागरिकांना , जिल्हा प्रशासनाला , पोलिसांना सर्वांना हा इशारा देण्यात आला .आज सकाळी या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. भरलेल्या धरणातून आसुसलेल्या नदीत पाणी आले धाऊन पण यात एक बिच्चारे कुत्रे गेले वाहून …