आज सकाळी 6 वाजताची धरणातील पाण्याची स्थिती -खडकवासला ९६.८७ टक्के ,पानशेत ६८. १२ टक्के ,वरसगाव५३.४० टक्के टेमघर ४८.६२ टक्के , चारही धरणात 17.82 TMC पाणी म्हणजे 61.12% साठा
पुणे- खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सकाळी 07:00 वा. 9416 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात आले असून पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या खडकवासला शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर -फुटाणे यांनी दिली आहे.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज पहाटे. 3.30 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2000 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला होता .हा विसर्ग वाढवून सकाळी 06:30 वा. 4708 क्यूसेक्स करण्यात आला. आणि विसर्ग आणखी वाढवून सकाळी 07:00 वा. 9416 क्यूसेक्स करण्यात आला आहे.
आजची धरणातील पाण्याची स्थिती -खडकवासला ९६.८७ टक्के ,पानशेत ६८. १२ टक्के ,वरसगाव५३.४० टक्के टेमघर ४८.६२ टक्के अशी आहे.
गेल्या वर्षापेक्षा बरा पाउस -आजच्या दिवशी गेल्या वर्षी चारही धरणात मिळून 16.57 TMC म्हणजे 56.85% पाणी साठा होता यंदा आज चारही धरणात 17.82 TMC पाणी म्हणजे 61.12% साठा झाला आहे .