Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रीय मंत्री मोहोळांच्या तत्परतेमुळे एशियन चॅम्पियनशिपसाठी स्पर्धेत भारताची व्हॉलीबॉल टीम वेळेत दाखल

Date:

पुणे -एशियन चॅम्पियनशिपसाठी इंडोनेशिकडे निघण्यासाठी भारताचा व्हॉलीबॉल पुणे विमानतळावर उशीरा पोहोचला पोहोचला. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्याही विमानतळावर साधारण दोन तास आधी पोहोचणे अपेक्षित असते. मात्र बंगलोरहून रस्ते मार्गे पुण्याकडे येणारा संघाला पुणे विमानतळावर पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे नियोजित विमान चुकेल या अंदाजामुळे संघाच्या वतीनं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना संपर्क केला असता त्यांनी विमानतळावरील प्रक्रिया तातडीने करुन घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भारतीय व्हॅालीबॅाल संघ नियोजित वेळेतच इंडोनेशियाकडे मार्गस्थ होऊ शकला.

इंडोनेशियामध्ये २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान येथे होणाऱ्या अंडर १७ व्हॉलीबॉल एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय व्हॉलीबॉल संघ पुणे एअरपोर्ट येथे दाखल झाला होता. हा संघ खरतर बंगळुरूवरून रवाना होणार होता. पण मुसळधार पावसाने तेथील विमान उड्डाण घेऊ शकत नसल्याने संघाने पुण्याहून रवाना व्हावे, असे ठरले. त्यासाठी हा संघ बसने प्रवास करून पुण्यात पोचला. मात्र त्यांना पोहोचायला उशीर झाला. यामुळे बहुधा आपण स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही असेच सर्व खेळाडूंना वाटल्याने ते नाराज झाले. त्याचवेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्य़ाशी फोनवर संपर्क साधून अडचण सांगितली. अडचण समजल्यावर राज्यमंत्री मोहोळ यांनी तात्काळ पुणे एअरपोर्ट येथे फोन करून भारतीय संघासाठी तत्काळ मदत उपलब्ध करण्यास सांगितले. इतकच नाही तर संघातील सर्वाना स्पेशल चेकिंग द्वारे त्यांच्या सुखरूप विमानामध्ये बसविले. त्यांच्या या तत्परतेमुळे भारतीय संघ वेळेत एशियन चॅम्पियनशिप साठी इंडोनेशिया येथे वेळेत सुखरूप पोहोचला. इंडोनेशियात उतल्यावर सर्व खळाडूंनी मेसेजव्दारे व अधिकाऱ्यांनी फोन करून मोहोळ यांना धन्यवाद दिले तर मोहोळ यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रवास करणारे आशियाई स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार असल्याने या सर्वांचे बोर्डिंग पास आणि परदेशात जाण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पुणे विमानतळावरील अधिकाऱ्यांना दिले. त्यांनीही आपल्या निर्देशानुसार प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आणि संकट टळले.’
ब्रिक्सच्या पथकालाही मोहोळांकडून दिलासा !

रशियात होत असलेल्या ब्रिक्स युथ फोरमच्या बैठकीत भाग घेण्यासाठी तरूणांचे शिष्टमंडळ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना होणार होते. पण त्यात काही अडचण आल्यावर या शिष्टमडळातील काहींनी राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या शिष्टमंडळाचा जाण्याचा मार्ग अधिक सुकर केला. त्याबद्दल या शिष्टमंडळातील मधिश पारीख यांनी मंत्र्यांनी दाखवलेली तत्परता ही बदल घडवण्याची ताकद असलेल्या युवावर्गासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात आपल्या एक्स अकाऊंटवरून भावना व्यक्त केल्या आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागत”

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे...

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या संविधान सद्भावना यात्रेला नाशिकरांचा उदंड प्रतिसाद. काँग्रेसचा १ मे...

बंदिशकार डॉ. माधुरी डोंगरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या...