पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन सुस्त झालेले आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होईल अशा पद्धतीने महापालिकेत करोडो रुपये लुटणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे . या पार्श्वभूमीवर महापालिकेतील तत्कालीन भाजपचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांना यावर विचार करा आणि आपापल्या अधिकाऱ्यांकडून कामे करवून घ्या असा मोलाचा सल्ला दिला आहे. महापालिकेत अनेक तज्ञ इंजिनियर , अधिकारी असताना आपण बाहेरून सल्लागार का नेमतो यामागील नेमके गूढ शोधून काढा असेही आवाहन केले आहे.
केसकर ,कुलकर्णी, आणि बधे यांनी म्हटले आहे कि,’महानगरपालिकेमध्ये सध्या सल्लागार यांचा सुळसुळाट झालेला आहे.प्रत्येक कामासाठी सल्लागार नियमावा लागतो ही शोकांतिका आहे.सल्लागार संस्थेकडे तज्ञ नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात.त्यांच्या कडे पे रोल वरील व्यक्तींची मागणी करावी ही विनंती आहे
पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ञ इंजिनियर असताना आपण सल्लागार का म्हणतो हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो आहे.आमची विनंती आहे या पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल.
महापालिकेत करोडो कमावणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट
Date:

