‘घराबाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन’:आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरोधात आव्हाडांची पोलिसांत तक्रार

Date:

मुंबई- अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आव्हाड यांना फोन करून, “घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन” अशी थेट धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर आव्हाड यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीने पाठवलेला व्हॉट्सॲप मेसेजही त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ताजी असतानाच, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 7038841820 ह्या इसमानी 2/3 वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्च भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली. हे आत्ता 4.30 पासून सुरू होते, तो इसम माझ्या घराच्या दरवाजावर उभा असल्याचं बोलत होता, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गरजू नागरिकांसाठी भवानी पेठेत ‘आदर्श सेवा ओपीडी’ सुरू

जनरल व नेत्रतपासणीसह मोतीबिंदू तपासणीची सुविधा उपलब्धपुणे : आर्थिकदृष्ट्या...

स्त्रीचा सन्मान करणारा समाज जगावर राज्य करतो

साहित्यिक मातृशक्ती सन्मानाने महिला साहित्यिकांचा गौरव नवा विष्णू चौक नवरात्र...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा

सुमेधा चिथडे, डायना पंडोल, सत्यभामा देशमाने यांचा यथोचित सन्मानपुणे...

गैरमार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात या; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आवाहन

काशेवाडीतील नवरात्रोत्सवात पोलीस आयुक्तांचे आवाहन; अवैध धंद्यांची माहिती निर्भयपणे...