तरुणाला नग्न करून बेदम मारहाण:पार्श्वभागात पेट्रोल टाकून अमानुष छळ

Date:

लातूर- येथे एका तरुणाला नग्न करून त्याला पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, या तरुणाच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा भयंकर प्रकारही समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या मारहाणीचा संपूर्ण थरार आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला. मारहाण करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यानेच नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरील विविध ग्रुप्सवर व्हायरल केला. हा अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतरच या भयंकर गुन्ह्याला वाचा फुटली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

या गंभीर घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले अन्य तीन ते चार आरोपी अद्याप फरार असून, पोलिस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मारहाणीची ही अमानुष घटना काही महिन्यांपूर्वी घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या तरुणाला मारहाण करण्यामागचे नेमके कारण काय, ही घटना नेमकी कधी घडली आणि आताच हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा आरोपींचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा

सुमेधा चिथडे, डायना पंडोल, सत्यभामा देशमाने यांचा यथोचित सन्मानपुणे...

गैरमार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात या; पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आवाहन

काशेवाडीतील नवरात्रोत्सवात पोलीस आयुक्तांचे आवाहन; अवैध धंद्यांची माहिती निर्भयपणे...

दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि महिला सुरक्षित राहाव्यात; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे देवीचरणी साकडे

आमदार निधीतून दिलेल्या रेणुका माता मंदिराच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या निधीच्या...