राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

Date:

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा सखोल आढावा बैठक संपन्न.

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. २७.०४.२०२६ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

सदर आढावा बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (RFD), अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा (DP), मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना व श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे व नाला सफाई, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा (रस्ते, पाणी, सांडपाणी) आणि शाळा व रुग्णालयांचे आधुनिकीकरण व दर्जा सुधारणा या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवणे, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी पूर्ण करणे यावर विशेष भर देण्यात आला. पुणेकरांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा, सुयोग्य नियोजन, स्वच्छ व सुंदर शहर तसेच आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या आणि आगामी विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विकासकामांना अधिक वेग, गुणवत्ता आणि परिणामकारकता देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले. सदर बैठकीसाठी उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या पक्षनेत्या सौ. हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे मा.पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त . नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मा.उपायुक्त, खातेप्रमुख, तसेच संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेत करोडो कमावणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट

पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन सुस्त झालेले आहे काय...

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...

भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का ?- अरविंद शिंदेंचा सवाल

पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...