पुणे- राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्य मंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांच्या एका पत्राने पुण्यात मोठी खळबळ उडू शकणार आहे.हे पत्र मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. आणि सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले आहे.या पत्राचा मजकूर एखाद्या बातमीदाराने एखादी संशय असलेली बातमी लिहावी अशा स्वरूपाचा असल्याने आणि तो चक्क सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी दिल्याने हि खळबळ उडू पाहते आहे. तर नेमके काय आहे ते पत्र ते प्रथम पहा

प्रति, पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुणे
विषयः हिंजवडी, पुणे येथील एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात विश्रांती कक्षाच्या वापराबाबत तक्रारींची चौकशी तसेच आवश्यक प्रतिबंधक व तथ्य पडताळणी उपाययोजना करण्याबाबत.
मला विविध स्रोतांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष (resting rooms) यांच्या वापराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आणि त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.
यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वरील माहिती ही अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नसून, तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे
विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने काउन्सलिंग/संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे तरी सदर विषय संवेदनशील असल्याने, आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.
(माधुरी मिसाळ)
आता हि नेमकी कोणती कंपनी, कुठे आहे , तिथे किती महिला -पुरुष कर्मचारी आहेत ? काय चालते तिथे / हा सारा पोलीस तपास म्हणण्यापेक्षा माहिती घ्यायचा भाग आहे. जी माहिती पोलिसाच काय , कोणीही डिटेक्टव्ह, शोध घेऊ शकेल असा इसम ,राजकारणी घेऊ शकतो . मग खरोखर याबाबत मंत्री महोदयांना काहीच ठाऊक नाही काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर … काय उत्तर असेल याचा प्रत्त्येक जण आपापल्या बुद्धीनुसार विचार करू शकतो. मग असे असेल तर नेमके या मंत्री महोदयांच्या डोक्यात चाललेय तरी काय ?असाही प्रश्न उपस्थित होईल. पण आता या सर्व शंका कुशंका याबाबतची उत्तरे कदाचित पोलीस आयुक्त अमितेश कुमार जेव्हा याबाबतची चौकशी करतील ,किंवा त्यांना माहिती आता पर्यंत मिळाली देखील असेला ते काय भूमिका घेतात आणि त्यानंतर मंत्री महोदय काय भूमिका घेतात यावर मिळविता येऊ शकतील असे दिसते आहे. पण एकूणच या पत्राने पुण्याच्या राजकीय कम धार्मिक वातावरणात काहीतरी घडते आहे / अशी चाहूल जर कोणाला लागली तर नवल वाटणार नाही .

