पुणे, २२ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ३२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर १,२६० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या मार्केट यार्ड परिसरात या शिबिरांचे आयोजन केले होते. या वेळी पुणे शहर युवामोर्चा सरचिटणीस अभिषेक भिमाले, सुशील लोंढे, गणेश शेरला, प्रशांत डिकोळे, ईश्वर वायळ, दत्ता बिबवे, नवनाथ वांजळे, विक्रम रोकडे, प्रमोद मोहिते, प्रतीक भिमाले, प्रशांत जाधव, प्रशांत लोंढे, रितेश बिबवे, प्रभाकर पवार, संजय साठे, प्रमोद शिळीमकर,करण भंडारी उपस्थित होते.
स्त्रीरोग व प्रसूती (गायनेकोलॉजी) सल्ला, त्वचारोग उपचार, कर्करोग तपासणी, एक्यूपंक्चर, महिलांसाठी मॅमोग्राफी, गुडघेदुखी व सांधेदुखी उपचार, दंत तपासणी व उपचार, नेत्र तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप, ईसीजी (हृदय तपासणी), रक्तदाब व मधुमेह तपासणी, रक्त व लघवी तपासणी तसेच मोफत औषध वाटप अशा विविध आरोग्यसेवा शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या.
“रक्तदानासह प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती करून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






