पुणे, दि. २२ : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत शहरभर ‘स्वच्छता सप्ताह’ राबविण्यात येत आहे. महापौर मंजुषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार विविध सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि डीप क्लिनिंग ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ बुधवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील श्री विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत शहरातील रस्ते, बसस्थानके, रेल्वे स्थानके, रिक्षा स्टँड, विमानतळ परिसर, शाळा, मंडई, बाजारपेठा, सरकारी इमारती, आरोग्य केंद्रे, झोपडपट्ट्या, वस्त्या, नदी-नाले, तलाव तसेच सार्वजनिक शौचालयांची टप्प्याटप्प्याने विशेष स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच आरआरआर (Reduce, Reuse, Recycle) केंद्रांवर ई-कचरा, प्लास्टिक, फर्निचर व इतर निरुपयोगी वस्तू संकलन मोहीमही राबविण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे,विरोधीपक्ष नेते निलेश निकम , उपमहापौर वाडेकर,अमोल बालवडकर ,सुहास टिंगरे आणि विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेत सुमारे २,००० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला, तर प्रारंभीच्या स्वच्छता मोहिमेत सुमारे ३ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करत शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले






